शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (23:11 IST)

Chanakya Niti : अशा व्यक्तीशी लग्न केल्याने भाग्य बदलते, वैवाहिक जीवन आनंदी राहते

आचार्य चाणक्य यांचे नाव भारतातील महान विद्वानांमध्ये समाविष्ट आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करूनच चंद्रगुप्त मौर्य राजा झाला. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात त्यांच्याशी लग्न केल्यास भाग्य बदलते. अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी असते. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी कोणते गुण सांगितले आहेत...
 
धैर्यवान व्यक्ति
संयम बाळगणारा माणूस आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, धैर्यवान व्यक्तिशी लग्न केल्यास भाग्य बदलते. जीवनात संयम बाळगणे फार महत्वाचे आहे.
 
जो समाधानी आहे
आचार्य चाणक्य यांच्या मते, समाधानी व्यक्तीशी विवाह केल्याने भाग्य प्राप्त होते. अशी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या जोडीदारासोबत असतो.   
 
गोड बोलणारा
आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गोड बोलले पाहिजे. गोड बोलणाऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यास नशीब बदलते. अशा व्यक्तीमुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते.
 
ज्याला राग येत नाही
राग हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. आचार्य चाणक्य नुसार ज्या व्यक्तीला राग येत नाही त्याच्याशी लग्न केल्याने भाग्य बदलते. ज्या घरात रागावलेले लोक नसतात त्या घरात देव वास करतो. जिथे देव राहतो तिथे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकत नाहीत.
 
धार्मिक व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते, धार्मिक विचार असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास भाग्य प्राप्त होते. ज्या घरात नित्य पूजा व पठण होते त्या घरात देवाचा वास असतो. अशा घरांमध्ये कोणतीही समस्या राहत नाही.