शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (23:41 IST)

Chanakya Niti - या 5 वाईट सवयींमुळे करावा लागतो आर्थिक संकटाचा सामना

नीती शास्त्रामध्ये चाणक्याने संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक समस्या आणि शत्रूंसह जीवनाच्या अनेक पैलूंवर विचार व्यक्त केले आहेत. आचार्य चाणक्यांचे विचार आजच्या काळातही समर्पक आहेत. जो चाणक्याच्या धोरणांचे पालन करतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो. चाणक्यानुसार, काही सवयींमुळे जीवनात आर्थिक अडचणी येतात. अशा परिस्थितीत माणसाने या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. 
 
उत्पन्नापेक्षा जास्त खर्च
चाणक्य नुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करू नये. जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो तो नेहमीच आर्थिक विवंचनेने त्रस्त असतो. चाणक्य नीतीनुसार पैसा जमवायला हवा, कारण पैसा कठीण काळात उपयोगी पडतो.   
 
कुसंगती
आचार्य चाणक्य म्हणतात की, वाईट लोकांची संगत करू नये. कारण वाईट लोकांची संगत माता लक्ष्मी कधीच करत नाही. तसेच अशा लोकांना जीवनात प्रत्येक क्षणी अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
फसवणूक करणाऱ्यांपासून दूर रहा
आचार्य चाणक्य यांच्या मते पाठीमागे फसवणूक करणाऱ्यांना समाजात मान-सन्मान मिळत नाही. चाणक्य सांगतात की असा स्वभाव असलेल्या व्यक्तीला पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीचा कोप होतो. 
 
लबाड माणसांपासून दूर राहा 
चाणक्याच्या मते, जो व्यक्ती नेहमी आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलतो, त्याच्यावर माता लक्ष्मी कधीच कृपा करत नाही. अशा लोकांना आयुष्यात इतरांसमोर अपमानित व्हावे लागते. 
 
मोठ्यांचा अपमान करणे
चाणक्य मानतात की जे मोठ्यांचा आदर करत नाहीत, त्यांच्या घरात गरिबी राहू लागते. यासोबतच माता लक्ष्मी अशा लोकांपासून दूर जाते. 
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)