दर्श अमावस्या 2023 :दर्श अमावस्येला हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतील
Darsh Amavasya:आज दर्श अमावस्या आहे. हिंदू शास्त्रात ही शुभ मानली जाते. या अमावास्येला श्राद्ध अमावस्या पण म्हणतात. याचा मागचे कारण असे की या दिवशी चंद्र दर्शन होत नसल्याने आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो.
हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतू दर्श अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी काही लोक व्रत देखील करतात. या दिवशी चंद्र दिसत नाही. कालसर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. अमावस्येला अवस देखील म्हणतात.
अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपले पितर पृथ्वीलोकात येतात. त्यांच्यासाठी जेवणाचे ताट काढून ठेवायला हवे. गाईला गूळ आणि जेवण द्यावे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व व्याधी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ते उपाय....
आपल्याला व्यवसायात अडचणी येत असल्यास हा उपाय केल्यास व्यवसायाच्या अडचणीतून मुक्ती मिळून व्यवसाय सुरळीत चालेल. यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी एक लिंबू घेऊन त्याचे 4 भाग करायचे आहे. त्यावर पिवळी मोहरी, 29 काळे मीरे आणि 7 लवंगा घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊन यावे आणि संध्याकाळी या सर्व वस्तूंना काळया कापड्यात बांधून कोरड्या विहिरीत टाकून यावे. असे केल्यास व्यवसाय सुव्यवस्थित चालून धनवर्षा होऊ लागेल.
दर्श अवसेच्या संध्याकाळी घराच्या ईशान कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल दोऱ्याचं वापर करून लावायला हवा. दिव्यात थोडे केसर घालून लावल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पैश्यांची कमतरता होत नाही.
गाईला हिरवे गवत खाऊ घालायला हवे, सर्व कार्यसिद्धी होते आणि कुशाग्र बुद्धी होते.
अवसेला रात्री 12 वाजता मोहऱ्या हातात घेऊन गच्चीवर जाऊन 3 वेळा परिक्रमा करुन ते सर्व दिशात फेकून हा मंत्र म्हणावा -
ll ॐ श्री हीं क्लीं महालक्ष्मये नमः ll
दर्श अमावस्या पूजन विधी (Darsh Amavasya Pujan Vidhi)
पुराणांनुसार अमावस्येला स्नान-दान करण्याची परंपरा आहे. तसं तर या दिवशी गंगा-स्नान केल्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे, परंतू जी व्यक्ती गंगा स्नानासाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनी जवळीक नदीत किंवा तलावात जाऊन अंघोळ करावी. हे देखील शक्य नसेल तर घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून अंघोळ करावी. आणि महादेव- पार्वती आणि तुळशीची पूजा करावी.
दर्श अमावस्येला व्रत करुन चंद्राची पूजा केल्याने चंद्र देवता कृपा करतात. सौभाग्य- समृद्धीचा आर्शीवाद देतात. चंद्र देव भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहे. याला श्राद्धाची अमावस्या देखील म्हणतात. कारण या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी पूवर्ज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आर्शीवाद देतात असे मानले गेले आहे.
Edited By- Priya Dixit