बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 19 मार्च 2023 (10:05 IST)

सूर्यास्ताच्या वेळी काय करावे आणि काय करू नये

घराच्या सुख-शांतीसाठी लोक खूप काही करतात, सकाळ संध्याकाळ घरात पूजा करतात, त्यामुळे घराची ऊर्जा सकारात्मक राहते. याशिवाय लोक दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन करतात. असे केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो, त्यासोबतच तुमचे शरीर रोगांपासूनही वाचते. याशिवाय सूर्यास्ताशी संबंधित काही मान्यता आहेत, ज्याचा अवलंब केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जीवनात कायम राहतो. चला तर मग जाणून घेऊया सूर्यास्ताच्या वेळी काय करावे आणि काय करणे टाळावे.
 
सूर्यास्ताच्या वेळी काय करावे
सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दारावर आणि मंदिरात दिवा अवश्य लावावा.
सूर्यास्तालाच्या वेळी ही सूर्याला नमस्कार करणे चांगले मानले जाते. असे केल्याने घरात सुख-शांती राहते.
सूर्यास्ताच्या वेळी आपल्या पूर्वजांना नमस्कार करावा. त्यांच्या चित्रासमोर दिवा लावावा, यामुळे पितरांचा आशीर्वाद कायम राहील. 
सूर्यास्ताच्या वेळी देवघरात दिवा लावून मंत्र, स्त्रोत पठण केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
सूर्यास्ताच्या वेळी काय करू नये
सूर्यास्ताच्या वेळी घरात कधीही अंधार ठेवू नये.
सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये. यामुळे गरिबी येते.
सूर्यास्तानंतर कधीही स्नान करू नये.
जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी कुठूनतरी परतत असाल तर घरी रिकाम्या हाताने येऊ नये.
सूर्यास्तानंतरही नखे कापू नयेत. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे ज्योतिषशास्त्रात नखे कापण्यासाठी चांगले दिवस मानले जातात.