शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पूजेत वापरू नये लोखंडी भांडी

देवांची पूजा करताना अनेक प्रकाराची भांडी वापरली जातात. शास्त्रांप्रमाणे वेगवेगळे धातू वेगवेगळे परिणाम देतात. यामागील कारण केवळ धार्मिक नसून वैज्ञानिकदेखील आहेत. असे काही धातू आहेत जे पूजेत वापरणे योग्य नाही कारण त्याने सकारात्मक परिणाम प्राप्त होत नाही.
पूजा आणि धार्मिक कार्यांमध्ये लोखंड आणि अॅल्युमिनियमला अपवित्र धातू मानले आहे. या धातूने मूर्ती आणि पूजेसाठी भांडी बनवू नये.
 
पाणी आणि वार्‍यामुळे लोखंडात गंज लागतं आणि अॅल्युमिनियमने काजळी निघते. पूजेत अनेकदा मूर्तीला स्नान करवण्यासाठी पाण्यात बुडवलं जातं किंवा स्वच्छ करण्यासाठी घासण्यातदेखील येतं. अशात लोखंड आणि अॅल्युमिनियम धातूमधून निघणारं गंज आणि काजळी यांच्या आमच्या त्वचेवर वाईट परिणाम पडू शकतो.
 
म्हणून पूजेत सोनं, चांदी, तांबा अश्या भांड्यांचा वापर केला पाहिजे. या धातूंना घासल्याने आमच्या त्वचेला फायदा होतो.