गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हिंदू धर्मानुसार कृष्ण हे पूर्ण पुरुष आहे

हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. भारतीय जनमानसावर, आध्यात्मावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला, कृष्णनीती, कृष्णकृत्य असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. त्याच्या लीलांमुळे तो बालगोपाळांना आपला वाटतो. 
 
त्याच्या अलौकीक व्यक्तिमत्वाची भुरळ गोपींवरही पडली होती. त्याचवेळी त्याच्या भगवदगीतेतील चिंतनातून तत्वज्ञ म्हणूनही तो ओळखला जातो. 
 
महाभारताच्या युद्धात पांडवांचा सल्लागार म्हणूनही त्याचे वेगळे दर्शन घडते. कृष्णाची ही रूपे जनमानसावर प्रभाव टाकणारी आहेत. 
 
कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कंसाची बहीण देवकी व वासूदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा. देवकीचा आठव्या मुलाच्या हस्ते आपला वध होणार असल्याचे भविष्य सांगितले गेल्याने कंसाने तिची सहा मुले आपटून ठार केली होती. बलरामाला योगमायेच्या रूपाने नेण्यात आले होते.