शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (16:54 IST)

साईबाबा मशीदीत का राहिले ?

शिरडीमध्ये साईबाबा आल्यावर तेव्हा त्यांनी एका मशीदीला वास्तव्याचे स्थान बनविले अखेर त्यांनी असे का केले ? त्यांना राहण्यासाठी इतर कोणती जागा नव्हती का की त्यांनी मुद्दाम असे केले होते? 
 
मशीदीत राहिल्यामुळे त्यांना लोक मुस्लिम मानायचे. परंतु ते त्या मशीदीत राहून रामनवमी, दिवाळी सारखे सण साजरे करायचे आणि धुनी लावायचे. मशीदीत दररोज दिवा लावायचे. हे सर्व काम एखाद्ये मुस्लिम मशीदीत कसे करेल? 
 
मशीदीत राहण्यापूर्वी ते एका कडुलिंबाच्या झाडाखाली राहत होते. त्या झाडाजवळ एक खंडर झालेली मशीद होती. या मशीदीत कोणीही नमाज वाचत नव्हते. कडुलिंबाच्या झाडाजवळ वास्तव्यच्या तीन महिन्यानंतर बाबा कोणाला ना सांगता शिरडी सोडून निघून गेले. लोकांनी त्यांना खूप शोधले पण ते सापडले नाही. 
 
भारताच्या प्रमुख स्थळी फिरून 3 वर्षानंतर आल्यावर साई बाबा चांद पाशा पाटील (धूपखेडाच्या एका मुस्लिम जागीरदार) सह त्यांच्या मेव्हणीच्या लग्नासाठी बैलगाडीत बसून व्हराडी म्हणून आले. 
 
वऱ्हाड जेथे थांबली होती तेथे समोरच खंडोबाचे देऊळ होते, तिथले पुजारी म्हाळसापती होते. बाबांना तरुण फकिराच्या वेशात बघून म्हाळसापती म्हणाले 'यावे साई' तेव्हा पासून त्यांचे नाव 'साई ' प्रख्यात झाले. म्हाळसापती ह्यांना साई बाबा 'भगत' म्हणून संबोधित करत होते.
 
बाबाने काही दिवस देऊळात घालवले, पण त्यांनी बघितले की म्हाळसापती ह्यांना संकोच होत आहे, तर ते समजून गेले आणि स्वतः देऊळातून बाहेर पडले आणि त्यांनी त्या खंडर पडलेल्या मशीदीला राहण्याचे ठिकाण बनवले. 
 
ही एक अशी जागा होती की ज्याला मशीद म्हणणे योग्य नाही. कारण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मीनार किंवा गुम्बज नव्हते. इथे नमाजाचे पठण देखील होत नव्हते. 
 
त्या काळात शिर्डी गावात फार कमी लोकांचे घर असायचे. एखादा माणूस कोणत्याही फकिराला आपल्या घरात कसे ठेवेल. पाहुणे म्हणून ठेवता येऊ शकत होत पण ज्याला अवघे आयुष्यच शिरडीमध्ये राहायचं आहे त्यांना स्वतःची वेगळी व्यवस्था तरी करावी लागणार. अशा परिस्थितीत बाबांना एकच जागा अशी दिसली जी कोणाच्या कामी येणार नव्हती आणि ती होती वास्तव्यास येत नसलेली मशीद. ते त्या मशीदीतच राहू लागले.
 
बाबांनी त्या मशीदीचे नाव ठेवले द्वारका माई. पण आजतायगत लोक त्याला मस्जिद म्हणतात आणि मराठी मध्ये त्याला मशीद म्हणतात. पण आता त्याला मशीद म्हणायला काहीच अर्थ नाही. कारण ती मशीद नाही. 
 
तरीही देखील त्याला मशीद का म्हणतात? 
भाविकांनी त्या मशीदीची डागडुजी करून त्याला चांगल्या राहत्या घराचे रूप दिले. नंतर त्याच्या जवळच बापू साहेब बुटीवाडा बनवला आहे. तेथेच बाबांचे समाधी मंदिर देखील आहे. त्याच प्रांगणात हनुमानाचे एक देऊळ देखील आहे जे बाबांच्या काळात देखील वास्तव्यास होते आणि आजतायगत देखील आहे. 
 
बाबांनी आपल्या राहत्या घरात द्वारकामाईमध्ये आपल्या योग शक्तीने अग्नी प्रज्वलित केली, नंतर ज्याला लाकडे टाकून आजतायगत देखील सुरक्षित ठेवले आहे. त्या धुनीच्या भस्मेला बाबांनी 'उदी' नाव दिले. बाबा ही उदी आपल्या भक्तांना वाटत असायचे. या उदीमुळे बरेच गंभीर रोग देखील बरे व्हायचे. द्वारकामाईच्या थोड्याच अंतरावर एक चावडी आहे, जिथे बाबा एकदिवसाआड आराम करायचे. साईबाबांचे भक्त त्यांना मिरवणुकीसह चावडी आणायचे. 
 
बाबांच्या पोषाखामुळे त्यांना सगळे मुस्लिम मानतात. त्यांच्या कपाळी जे कफनी बांधली होती ते त्यांच्या हिंदू गुरु वैकुंशाबाबाने बांधली होती. आणि त्यांना दिलेला चिमटा त्यांच्या प्रारंभिक नाथ गुरुने दिले होते. त्यांच्या कपाळी जो शैवपंथी टिळा लावायचे ते देखील नाथ पंथाच्या योगींनी लावले होते आणि त्यांच्या कडून वचन घेतले की हे आयुष्यभर धारण कराल. या शिवाय त्यांचे संपूर्ण बालपण सूफी फकिराच्या सानिध्यात निघाले.