शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गणपतीला जानवे कसे घालावे?

आजपर्यंत आपण गणपतीच्या अनेक मूर्त्या किंवा चित्रे पाहिली असतील तर असे आढळून आले असेल की गणेशाच्या गळ्यात जानवे असते. तसेच याबद्दल काही माहिती जाणून घेऊया- 
 
जानवे म्हणजे काय? 
हिंदू धर्मात जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे एक सूत्र आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते. जानवे कापसाच्या तंतूंनी तयार केलं जातात. याची तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. तीन पदर एकत्र करून एक विशिष्ट गाठ ज्याला ब्रह्मगाठ म्हणतात ती बांधली जाते अशा रीती जानवे तयार होतात. 
 
जानव्यात तीन सूत्र - त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक - देवरुण, पितृरुण आणि ऋषिरुण - सत्त्व, रज आणि तम यांचे प्रतीक आहे. यासोबतच ही तीन सूत्रे गायत्री मंत्राच्या तीन चरणांचे प्रतीक आहेत आणि तीन आश्रमांचेही प्रतीक आहेत.
 
जानव्यात प्रत्येक सूत्रात तीन तार असतात. त्यामुळे एकूण संख्या नऊ अशी असते. त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे. जानव्यातील एकूण ९ तंतूं- पहिल्या तंतूवर ओमकार, दुसर्‍यावर अग्नी, तिसर्‍यावर नवनाग, चौथ्यावर सोम, पाचव्यावर पितर, सहाव्यावर प्रजापती, सातव्यावर वायू, आठव्यावर यम, नवव्यावर विश्वदेव असतो.
 
यामध्ये एक तोंड, दोन नाकपुड्या, दोन डोळे, दोन कान, विष्ठा आणि लघवीच्या दोन मार्गांसह एकूण नऊ आहेत. याचा अर्थ - आपण तोंडाने चांगले बोलावे आणि चांगले खावे, डोळ्यांनी चांगले पाहिले पाहिजे आणि कानांनी चांगले ऐकले पाहिजे. ब्रह्म, धर्म, अर्ध, काम आणि मोक्ष यांचे प्रतीक असलेल्या जानव्यात पाच गाठी ठेवल्या जातात. हे पाच यज्ञ, पाच इंद्रिये आणि पाच क्रिया यांचेही प्रतीक आहे.
 
गणपतीला जानवे कसे घालावे?
राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।
 
श्रीगणेशांना जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.
 
तसेच गणपतीला कधीही पांढरे वस्त्र अर्पित करु नये. गणपतीला पांढरे जानवे देखील अर्पित करु नये असे सांगितले जाते. जानवे हळदीत पिवळे करुन गणपतीला अर्पित केले पाहिजे.
 
आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी बुधवारी गणपतीला जानवे अर्पित करावे. सोबत पाच अख्ख्या सुपार्‍या ठेवाव्या. मग गणपतीचे ध्यान करावे. असे केल्याने धन वृद्धी होते असे मानले जाते.
 
मनुष्याने जानवे वापरण्याचे नियम
जानवे डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे धारण करावे. ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे. अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे. जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे. शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुसर्‍याचे जानवे वापरु नये. जानवे तुटले तर ते उदकात टाकून द्यावे तसेच नवे धारण करावे.
 
जानवे धारण करताना खालील मंत्र म्हणतात - 
ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।
 
तसेच जानवे बदलताना हा मंत्र-
एतावद् दिन पर्यंन्तं ब्रह्मं त्वं धारितं मया|
जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सुत्र यथा सुखम्||