मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा, घरात कायम सुख-समृद्धी राहील

Naivedya सनातन धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे. भक्तीमार्गाने अल्पावधीतच ईश्वरप्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते. म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात. शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच घडतात. तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा- 
 
सात्विक पदार्थ
सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत. यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे. अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे.
 
उष्टे अन्न
देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये. यामुळे देव नाराज होतो. यासाठी जेवणापूर्वी फळे, मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा. पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा.
 
तांब्याच्या, चांदीच्या किंवा सोन्याच्या पात्रात नैवद्य ठेवून देवाला अर्पण केले पाहिजे. पत्राच्या गोलाकार चंचु पात्राच्या साह्याने पाणी फिरवले नंतर हात जोडून नैवद्य मंत्राचे जप केले पाहिजे.
 
या मंत्राचा जप करा
नैवेद्य मंत्र
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं में ह्यचलां कुरु ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।
 
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
 
वैदिक मन्त्र
ॐ नाभ्या आसीदन्तरीक्षँ शीर्ष्णो द्यौ: समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिश: श्रोत्रातथा लोकाँ अकल्पयन् ।।
 
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा ।
ॐ समानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा ।
ॐ व्यानाय स्वाहा । नैवेद्यं समर्पयामि
 
तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे. तर प्रत्येक देवी देवतांना त्यांच्या आवडी प्रमाणे विशेष नैवेद्य तयार करुन अर्पण केले पाहिजे. जसे गणपतीला मोदक, कृष्णाला लोणी-साखर, विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर इतर.