शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (07:40 IST)

श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र

Shri Datta Ashtakam
अत्यंत प्रभावी बावन्नश्लोकी गुरुचरित्र
श्री गुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे दर गुरुवारी हे बावन्नश्लोकी गुरुचरित्र म्हणावे.
 
श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः । अथ ध्यानम् ।
 
श्‍लोक: दिगंबरं भस्मसुगंध लेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च । पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं नमभीष्टसिद्धिदम् ॥ १ ॥
 
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥
 
कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः । द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ ३ ॥
 
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ श्‍लोक ॥
 
त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा । सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥ २ ॥
 
जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥ ३ ॥
 
ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥ ४ ॥
 
भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥ ५ ॥
 
तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥
 
ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥ ७ ॥
 
गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्‍ती । तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥
 
श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥
 
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥
 
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची॥ ११ ॥
 
श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥ १२ ॥
 
श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥
 
ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥ १४ ॥
 
ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥
 
विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥
 
ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥ १७ ॥
 
ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्‍ति नोहे अंतःकरणीं कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥ १८ ॥
 
अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥ १९ ॥
 
स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥ २० ॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥ २१ ॥
 
तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥ २२ ॥
 
लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्‍तीसीं । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥
 
शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥
 
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥
 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्‍तीसी । वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥
 
चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥ २७ ॥
 
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥
 
पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥ २९ ॥
 
श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृ‍प्‍त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥
 
पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥ ३२ ॥
 
श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥
 
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि । तया काश्‍मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥
 
पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली । मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥
 
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥
 
ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु । सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥
 
आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥ ३८ ॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥
 
जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी । नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥ ४१ ॥
 
मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥
 
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥ ४३ ॥
 
श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन । आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥
 
तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥
 
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥
 
सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥ ४७ ॥
 
श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥
 
त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥ ४९ ॥
 
तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥
 
राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥ ५१ ॥
 
म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥ ५२ ॥
 
इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्‍लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥