शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 9 एप्रिल 2023 (10:02 IST)

चंद्र दिसत नसेल तर संकष्टी व्रत कसे मोडायचे?

full moon
शास्त्रात सांगण्यात आले आहे की, जर कोणत्याही कारणाने चंद्र दर्शनात काही अडचण येत असेल तर काही उपाय करून चंद्र न पाहताच व्रत पूर्ण करता येते. तो उपाय काय आहे ते जाणून घेऊया-
 
संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपतीची केली जाते. या दिवशी दिवसभर उपवास ठेऊन सायंकाळी गणेशाची आराधना करून शेवटी चंद्र पाहून त्याला अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो. हे व्रत सोडण्यापूर्वी चंद्र दर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे असले तरी धुके आणि ढगांमुळे चंद्र दिसत नसल्याने महिलांना उपवास सोडण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास करणारे चंद्र न पाहताच उपवास सोडू शकतात. शास्त्रात सांगण्यात आले आहे की, जर कोणत्याही कारणाने चंद्र दर्शनात काही अडचण येत असेल तर काही उपाय करून चंद्र न पाहताच व्रत पूर्ण करता येतं. ते उपाय काय आहे ते जाणून घेऊया-
 
जर चंद्र दिसत नसेल तर शुभ मुहूर्तावर पूजा करता येते. यासाठी एका चौरंगावर लाल कापडा पसरवून त्यावर तांदळाने चंद्राचा आकार काढावा. ओम चतुर्थ चंद्राय नमः मंत्राचा उच्चार करून चंद्राला आवाहन केल्यानंतर, नियमानुसार पूजा करून व्रत पूर्ण करता येतं.
 
जर चंद्र दिसत नसेल तर भगवान शंकराच्या मस्तकावर बसलेला चंद्र पाहू शकता. नंतर चंद्राची पूजा करून क्षमा मागावी.
 
चंद्रोदयाची नेमकी वेळ जाणून घेतल्यानंतर चंद्र ज्या दिशेने उगवतो. त्या दिशेला तोंड करून पूजा करा आणि चंद्रदेवांची क्षमा मागा.
 
शक्य असल्यास, चंद्र दिसत असलेल्या भागातून त्याचे चित्र पाहून उपवास सोडू शकतात.
 
चंद्र दिसत नसेल तर घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन उपवास सोडावा.
 
जर चंद्र दिसत नसेल तर ताटात भात घ्या आणि त्याला चंद्राचा आकार द्या.
 
वडीलधाऱ्यांच्या हातून पाणी घेऊन उपवास सोडू शकता आणि पुढच्या चतुर्थीला चंद्र पाहण्याचा संकल्प घेऊ शकता.