1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Mahalxmi देवीला या प्रकारे प्रसन्न करा, निरोगी राहाल आणि धनाची आवक वाढेल

शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवी, संतोषी माता आणि माँ काली यांचा दिवस आहे. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केल्याने कर्जातूनही मुक्ती मिळते आणि पैशाचा ओघही वाढतो. यासोबतच तब्येतही सुधारते. चला जाणून घेऊया महालक्ष्मीला कसे प्रसन्न करावे.
 
शुक्रवारचे उपाय
1. या दिवशी पत्नीशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका आणि तिला आनंदी ठेवा.
 
2. शुक्रवारी आंबट खाल्ल्याने आरोग्य बिघडते, असे मानले जाते की एखादी दुर्घटना-अपघात होऊ शकतो.
 
3. तुरटीच्या पाण्याने स्नान केल्याने शुक्राचे दोष दूर होतात.
 
शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करा:-
1. या दिवशी श्री हरी विष्णू प्रिया माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा.
 
2. लक्ष्मीची पूजा आणि आरती झाल्यानंतर खीरीचा प्रसाद ग्रहण करा आणि 5 मुलींना द्या.
 
3. महालक्ष्मी मंदिरात जाऊन आईला कमळाचे फूल आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा.
 
4. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीची विधिवत पूजा करून घेऊ शकता.
 
5. या दिवशी सर्वांना मिठाई वाटून गरिबांना खाऊ घाला.
 
6. पिवळे फुल अर्पण करूनही आईला प्रसन्न करता येते, देवीला लाल गुलाबही आवडतात.
 
7. देवीला प्रसन्न करण्यासाठी केशरी भात देखील अर्पण केला जातो.
 
8. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. त्यात सर्वात शुद्ध पाणी भरले जाते. देवीला श्रीफळ आवडतं.
 
9. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास आईला खीर, शिरा, ऊस, मखाणे, बताशे, डाळिंब, विडा आणि आम्रबेलही अर्पण करू शकता. यामुळे फायदा होतो.