रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शनीची पूजा करताना या 6 प्रकारे सावधगिरी बाळगणे आवश्यक

शनी देवाला सर्व घाबरतात. परंतू ते सात्त्विक आणि प्रामाणिक मार्गावर चालणार्‍यांचे मुळीच नुकसान करतं नाही. तरी आपण ही शनीची पूजा करत असाल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि सावधगिरी बाळगून शनी देवाला प्रसन्न करावे.
 
1 : तांब्याच्या भांड्याने पूजा करू नये
शनी देवाची पूजा करताना चुकूनही तांब्याची भांडी वापरू नये. तांब्याचा संबंध सूर्यदेवाशी असतो आणि सूर्यपुत्र असूनही शनी देव सूर्याचे परम शत्रू आहे. शनी देवाची पूजा करताना नेहमी लोखंडी भांडी वापरावी.
 
2: या रंगांपासून दूर राहा
शनी देवाची पूजा करताना निळा किंवा काळा रंग वापरू शकता. परंतू लाल रंग किंवा लाल फूल देखील वापरू नये. लाल रंग मंगळाचा परिचायक आहे आणि मंगळ देखील शनीचा शत्रू आहे.
 
3: दिशेबद्दल सावध राहा
शनी देवाची पूजा करताना दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सहसा पूर्वीकडे मुख करून पूजा केली जाते परंतू शनी देवाची पूजा पश्चिम दिशेकडे मुख करून करणे योग्य ठरेल. कारण शनी देवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले गेले आहे.
 
4: शनी देवाच्या डोळ्यात बघू नये
शनी देवाची पूजा करताना त्यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून प्रार्थना करू नये. त्यांच्या डोळ्यात बघू नये. प्रार्थना करताना हे लक्षात असू द्यावे की त्यांची दृष्टी सरळ आपल्यावर पडत आहे आणि आपण नकळत त्यांच्या क्रोधाचे शिकार होऊ शकता.
 
5: स्वच्छता आवश्यक आहे
शनी देवाची पूजा करताना स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. त्यांची पूजा कधीही अस्वच्छ, अपवित्र वातावरण तसेच घाणेरडे कपडे घालून करू नये.
 
6: केवळ या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा
शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी त्यांना काळे तीळ आणि खिचडी या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.