गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (12:27 IST)

शास्त्राप्रमाणे सुकलेली तुळस घरात ठेवणं अशुभ असत?

शास्त्रांमध्ये तुळस पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. घराच्या आंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते.
 
या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील किटाणू घालवण्याचं काम करते. घरातलं वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाचा मोठा हात असतो.
 
मात्र जर तुळशीचं रोपटं सुकून गेलं, तर असं रोपटं घरात ठेऊ नये. एखाद्या नदीच्या पत्रात हे रोपटं सोडून द्यावं. याऐवजी तुळशीचे नवीन रोपटे घरात लावावं. सुकलेली तुळस ही वैद्यकीय दृष्ट्याही फायद्याची नसते आणि आध्यात्मिक दृष्ट्याही.
 
सुकलेल्या तुळशीचं रोपटं घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. घरातील प्रगतीवर याचा परिणाम होऊ शकतो. नकारात्मक शक्ती वाढीस लागतात आणि घरातील शांतता बिघधढण्यास सुरूवात होते. त्यामुळे असं तुळशीचं रोपटं घरात ठेवू नये. अशा रोपट्याची पूजाही करू नये. अशा रोपट्याटचं पाण्यात विसर्जन करावं आणि नवी तुळस लावावी.