1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (11:33 IST)

रामायण मधील शूर्पणखा बद्द्ल दहा मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

shurpankha in ramayana
वाल्मीकि रामायण, रामचरितमानस, रामचंद्रिका, साकेत, साकेत संत, पंचवटी आदि ग्रन्थात शूर्पणखाबद्द्ल माहिती मिळते. हे सगळ्यांना माहित आहे की लक्ष्मण यांनी शूपर्णखाचे नाक कापले होते. चला जाणून घेऊ या शूर्पणखा बद्द्ल दहा मनोरंजक गोष्टी -
 
१. शूर्पणखा ही कोण होती
ऋषि विश्वश्रवा आणि कैकसी यांची मुलगी तथा लंका नरेश रावण यांची बहिण होती शूपर्णखा. शूर्पवत नखानि यस्या सा शूपर्णखा  म्हणजे जिचे नखे सूपा समान आहे . 
 
२. शूर्पणखाच्या पतीचे नाव-
कुबेरला अपराजित करून रावणने लंका वर विजय प्राप्त केली होती. त्यानंतर आपली बहिण शूपर्णखा हिचा विवाह कालकाचे पुत्र दानवराज विद्युविव्हा यासोबत केला होता.
 
३. शूर्पणखाचा रावणाला श्राप-
त्रिलोक विजयावर निघालेल्या रावणाने एका युद्धात विद्युविव्हा याचा वध केला.पतिच्या  निधनाने शूपर्णखा खूप दुःखी झाली होती. तिने मनातल्या मनात रावणला श्राप दिला होता की माझ्या मुळेच तुझा सर्वनाश होईल.
रावणाने तिला आश्वस्त करून आपला लहान भाऊ खर याच्यासोबत रहायला पाठवून दिले. ती दंडकारण्यात राहू लागली  आख्यायिकाच्या  आधारावर हे पण सांगितले जाते की एकदा रावण शूपर्णखाच्या घरी जातो. शूपर्णखाचा पति विद्युविव्हा श्रीहरिचे उपासक होते. व श्रीहरि प्रति त्याची भक्ति पाहून रावण क्रोधित झाला आणि त्याने त्याचा तिथेच वध केला. 
 
४. श्रीराम यांच्यावर मोहित झाली शूर्पणखा-
कथा अनुसार श्रीराम दंडकारण्यातच राहत होते. तिथे जेव्हा शूर्पणखा हिने श्रीरामांना पाहिले तर ती त्यांना पाहून त्यांच्यावर मोहित झाली. श्रीरामांचा सम्पूर्ण  परिचय जाणून ती श्रीरामांना म्हणाली की या प्रदेशाची मी 
स्वेच्छाचारिणी राक्षसीण आहे. मला सर्व घाबरतात विश्रवाचा पुत्र बलवान रावण माझा केले हे ऐकून श्रीरामांनी स्मितहास्य केले  आणि म्हणालेत की-माझा विवाह झाला आहे .माझी पत्नी माझ्या सोबत आहे माझा  लहान भाऊ अविवाहित आहे तर तू त्याच्यापाशी जा. 
 
५. लक्ष्मणने शूर्पणखाचे नाक कापले-
शूर्पणखाने लक्ष्मण यांचा समोर विवाहचा  प्रस्ताव ठेवला तर लक्ष्मण ने तिचा प्रस्ताव अस्वीकार करून तिला परत श्रीरामांकडे जायला सांगितले. हे ऐकून शूर्पणखा रागावली.आणि म्हणाली की, मी सीतेला आत्ताच खाऊन टाकते मग ही सवत राहणार नाही मग आपण विवाह करू. जेव्हा शूर्पणखा सीतेवर हल्ला  
 करायला गेली तेव्हा श्रीरामांच्या आदेशानुसार लक्ष्मण ने  तिचे नाक कापले असे म्हणतात की जेव्हा ही घटना घडली तेव्हा हे तिघे पंचवटी मध्ये राहत होते. पंचवटी नाशिक मध्ये आहे. हे पण बोलले जाते की नाशिकचे नाव नाशिक यासाठी आहे की तिथे शूर्पणखाचे नाक कापले होते. पण काही विद्वान् हे मानत नाही.
 
६. खर आणि दूषणचा वध-
शूर्पणखा आपले कापलेले नाक घेऊन खर आणि दूषण या आपल्या बंधू जवळ गेली. मग या दोघांनी आपली सेना घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण सोबत युद्ध केले पण श्रीराम यांनी लक्ष्मण आणि सीता यांना एक सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले व श्रीरामाने युद्ध केले शेवटी श्रीराम यांनी खर आणि दूषण यांचा सेना सहित वध केला. ऋषि आणि गंधर्व हे देखील हे युद्ध पाहत होते. श्रीराम यांनी खर, दूषण, त्रिशिरा तथा चौदा हजार राक्षसांचा वध केला. 
 
७. शूर्पणखा रावणाच्या सभेत पोहचली-
पंचवटित अपमानित झालेली शूपर्णखा आपला भाऊ रावणाच्या सभेत पोहचली आणि घडलेले सांगितले आणि रावणाचे कान भरले की 'सीता अत्यंत सुंदर आहे ती तुझी पत्नी बनण्यासाठी सर्व योग्य आहे.
तेव्हा रावणने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपला मामा मारीच यासोबत सीता हरणची योजना आखली. 
 
८.शूर्पणखाचा पूर्वजन्म-
असे म्हणतात की पूर्वजन्मी शूर्पणखा ही इन्द्रलोकातील 'नयनतारा' नावाची अप्सरा होती. त्यावेळेला पृथ्वी वर 'वज्रा' नावाचे एक ऋषि घोर तपस्या करत होते. तेव्हा या अप्सरेला ऋषीची तपश्चर्या भंग करायला इंद्रानी पृथ्वी वर पाठवले होते. मग ऋषींची तपश्चर्या भंग झाल्यावर त्यांनी या अप्सरेला श्राप दिला की तू राक्षसी होशील. व त्या अप्सरेला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला व तिने क्षमा मागितली. मग ऋषींनी तिला सांगितले की राक्षस जन्मात तुला प्रभु श्री हरींचे दर्शन होईल व ऋषींनी दिलेल्या श्राप मुळे अप्सरा देह त्यागुन राक्षस बनली. 
 
९.शूर्पणखाचे ज्ञानाचे चक्षु उघडले-
जेव्हा लक्ष्मण यांनी शूपर्णखाचे नाक आणि कान कापलेत तेव्हा शूर्पणखाचे ज्ञानाचे चक्षु उघडले आणि तिला जाणवले की ती कोण आहे. तेव्हा प्रभुचे कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक बनुन प्रभूंच्या हातून खर, दूषण, 
रावण, कुंभकर्ण, मेघनाद आदि निशाश्चराचा वध झाला आणि प्रभूंच्या प्राप्तिसाठी पुष्करजी येथे गेली आणि पाण्यात ऊभी राहून भगवान शंकरांची आराधना केली. असे पण म्हणतात की रावण वध नंतर शूर्पणखा दैत्य गुरु शुक्राचार्यां जवळ जंगलात त्यांच्या आश्रमात राहू लागली. 
 
१०. श्रीकृष्ण यांची पत्नी-
अशी आख्यायिका आहे की शिव आराधना नंतर भगवान शिव यांनी शूर्पणखाला दर्शन दिले व वरदान दिले की द्वापर युगात जेव्हा श्रीराम हे कृष्णअवतार घेतील. तेव्हा कुब्जा या रुपातले तुझे कूबड प्रभु ठीक करतील आणि तुझे पाहिले रूप 'नयनतारा' अप्सराचे  मनमोहक रूप तुला प्रदान करतील. अशाप्रकारे आपण शूर्पणखा बद्द्लच्या या दहा मनोरंजक गोष्टी जाणून घेतल्या.