शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (15:36 IST)

एकश्लोकी रामायण : मात्र एका श्लोक मध्ये संपुर्ण रामायण, राम कथा

Ek Shloki Ramayan : वाल्मीकी कृत रामायण मध्ये कमीतकमी २४,००० श्लोक आहेत. यापेक्षा छोटया रामायण मध्ये १० श्लोक आहे. जे मूळ रामायणच्या नावाने प्रसिद्ध आहे. यानंतर 'एकश्लोकी रामायण' पण आहे. ज्यात मात्र एका श्लोकमध्ये संपूर्ण रामायण पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते. हा श्लोक किंवा या मंत्राला जपल्याने श्रीराम आणि हनुमानजींची कृपा प्राप्त होऊ शकते.
 
एकश्लोकी रामायण:-
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम् । 
वैदेहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम् ।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम् । 
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम् ।।
 
भावार्थ : 
१. एकदा प्रभु श्रीराम वनवासात गेले. तिथे त्यांनी स्वर्ण मृगचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला.
२. त्याचवेळेस त्यांची पत्नी वैदेही (माता सीता) यांचे रावणद्वारा हरण झाले. त्यांचे रक्षण करताना पक्षीराज जटायु यांचा मृत्यु झाला. 
३. यानंतर श्रीराम यांची मित्रता सुग्रीव यांच्यासोबत झाली आणि श्रीराम यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
४. त्यांनी सुग्रीव यांच्या दुष्ट बंधू बालीचा वध केला. मग समुद्रावर पूल बांधून पार केले. हनुमानजींनी लंकापुरी पुर्ण दहन केली.
५. यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांचा वध झाला. ही पूर्ण रामायणची संक्षिप्त कहाणी आहे.
ek shloki ramayan
ek shloki ramayan