1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (15:08 IST)

भक्ती म्हणजे

किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा... 
 
भक्ती जेव्हा "अन्नात" शिरते तेव्हा तीला "प्रसाद" म्हणतात
आणि भक्ती जेव्हा "भुकेत" शिरते तेव्हा तीला "उपवास" असे म्हणतात
 
भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तीला "तीर्थ" म्हणतात
आणि भक्ती जेव्हा "प्रवासाला" निघते तेव्हा तीला "यात्रा" असे म्हणतात
 
 
भक्ती जर का "संगीतात" शिरली तर तीला  "भजन / कीर्तन" म्हणतात
आणि हीच भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तीला "भारूड" असे म्हणतात
 
भक्ती जेव्हा "माणसात" प्रकटते तेंव्हा "माणूसकी" निर्माण होत
आणि हीच भक्ती जर "घरात" शिरली तर त्या घराचे "मंदिर" होते 
 
भक्ती जर का शांतपणे "मनाच्या गाभाऱ्यात" शिरली तर त्याला "ध्यान" म्हणतात
आणि भक्ती जर का "कृतीत" उतरली तर तिला "सेवा" असे म्हणतात