शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:46 IST)

लघु भागवत मंगलाचरण

आर्या.
आजन्म तुझे झाले मजवरि अगणित अखंड उपकार ।
त्या तुज मंगलरुपा करितों साष्टांग मी नमस्कार ॥१॥
त्वन्नाम सुप्रभातीं देवा स्मरतांचि कामना पुरती ।
शमती समस्त दुरितें नानाविध रोग संकटे हरती ॥२॥
अन्नाच्छादन देउनि करुनी जलवृष्टि रक्षिसे सृष्टी ।
ही केवढी तुझी बा आह्मां जीवांवरी कृपादृष्टी ॥३॥
करुणेशा सर्वेशा सर्वांची काळजी तुला आहे ।
परि मन अधीर अमुचें भलतें योजूनि तुजकडे पाहे ॥४॥
मोह कलह कपट नको द्वेष नको भीरुता वृथा गर्व ।
मज योग्य तेंचि देईं सर्वज्ञा कळतसे तुला सर्व ॥५॥
करुनी दया क्षमा मज व्हावी देवा कृतापरधांची ।
न शिवो मच्चित्तांतें केव्हांही कल्पना विरोधाची ॥६॥
काय अधिक मागावें जनतेची धर्मबुद्धि वाढावी ।
वेद विभो रक्षावे दु:खातुनि आर्यभूमि काढावी ॥७॥
(पद - ऊठिं गोपालजी जाइं धेनूकडे - या चालीवर.)
देवि दुर्गे तुला जोडितों मी करां । रक्षिं या पामरा पदरिं घेईं ॥ धृ.॥
धर्म गेला लया दाविती रिपु भया । अंबिके करिं दया अभय देंई ॥१॥
विषयसुख नावडो काम मदही झडो । चित्त माझें जडो आत्मरुपीं ॥२॥
क्रोध मत्सर जळो दुरित दूरी पळो । द्वैतबाधा टळो सर्वभूतीं ॥३॥
बुद्धि सुस्थिर असो शांति हृदयीं वसो । लोभ अथवा नसो मोह कांहीं ॥
सर्व मंगल करीं षडरितापां हरीं । तुजसि माहेश्वरी प्रार्थना हे ॥५॥
दुष्ट संगति सदा भोगवी आपदा । सोडवीसी कदा देवि अंबे ॥६॥
भक्तजनपालके दुष्टसंहारके । चरणिं तव कालिके ठाव देईं ॥७॥
भक्त गोविंद मी संसृतीच्या भ्रमीं । पडुनि झालों श्रमी मुक्ति देईं ॥८॥