1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मार्च 2025 (21:29 IST)

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

mangalsutra Bandhan
कन्यादान केल्यावर पुढचा विधी आहे मंगळसूत्र बंधन. या मध्ये वधू आणि वर हे पूर्वीकडे तोंड करून बसतात. वर पक्षाकडील ज्येष्ठ सुवासिनी वधूला कुंकू लावून साडी आणि मणी मंगळसूत्र देतात. मणी मंगळसूत्र म्हणजे काळ्या मणींची पोत असते या मध्ये मधोमध सोन्याच्या दोन वाट्या असतात. एक वाटी माहेरची तर एक वाटी सासरची असते. मणिमंगळसूत्र काळ्या पोतीसह सोन्यात गुंफलेले असते.
मंगळसूत्राच्या वाटयांमये उलट्या बाजूला एका वाटीत हळद आणि एका वाटीत कुंकू भरलेले असते. वधू साडी नेसून येते आणि वराच्या शेजारी बसते. वर मणी मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालतो आणि कुलदेवतेचे स्मरण करून मांगल्य तंतुनानेन ममजीवनहेतुना कंठे बध्नामी |’हे मंत्र म्हणतो. नंतर वर पक्षातील स्त्रिया तिला अलंकार देतात.अशा प्रकारे मंगळसूत्र बंधन पूर्ण होते. 
भांग भरणे- 
 मंगळसूत्र बंधन विधी नंतर वर वधूच्या भांगेत कुंकू भरतो.कुंकू हे सौभाग्याचे वाण आहे. वर वधूच्या भांगेत नाण्याने कुंकू भरतो. कुंकवाला सौभाग्याचे चिन्ह मानले आहे. देवपूजा, लग्न, मुंज, समारंभात कुंकवाचा वापर केला जातो. देवाला वाहिल्या जाणाऱ्या अक्षता देखील तांदुळाला कुंकू लावून बनवतात. सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावते. कोणत्याही मंगलप्रसंगी पुरुषांना देखील कुंकू लावतात. हे शुभ मानतात.