रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे.  
 
नियम
या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे.
हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात.
व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा.
हे व्रत करणार्‍यां स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे.
रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.
पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं.
व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.
पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवावी. मात्र उपास स्वत: करावा.
लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्य चा पाठ करू शकतात.