सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (08:23 IST)

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता

Hanuman aarti in marathi
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी  अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥
 ।। इति श्री रामदासकृतं मारुती स्तोत्रं संपूर्ण।। 
।। शुभमं भवतु शुभमं भवतु ।।