Masik Shivratri : नवीन वर्षात साजरी होणार मासिक शिवरात्री, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्याच दिवशी भगवान शंकराच्या पूजेचा विशेष योगायोग होत आहे. या दिवशी मासिक शिवरात्रीचे व्रत केले जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्रीचे हे व्रत मासिक शिवरात्री म्हणून ओळखले जाते. शिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे. भारतीय पौराणिक कथेनुसार, महाशिवरात्रीच्या मध्यरात्री भगवान शिव लिंगाच्या रूपात प्रकट झाले. शिवलिंगाची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांनी केली होती. हा दिवस दर महिन्याला साजरा केला जातो तर महाशिवरात्री वर्षातून एकदा येते. मासिक शिवरात्रीचे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
ज्या भाविकांना मासिक शिवरात्रीचे व्रत करायचे आहे त्यांनी ते महाशिवरात्रीच्या दिवसापासून सुरू करून वर्षभर चालू ठेवू शकतात. मासिक शिवरात्रीचे व्रत केल्यास कठीण कामे पूर्ण होतात असा समज आहे. भक्तांनी मध्यरात्री शिवाची पूजा करावी. अविवाहित स्त्रिया विवाहासाठी हे व्रत ठेवतात आणि विवाहित महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात शांती राहण्यासाठी हे व्रत करतात.
मासिक शिवरात्री तिथी
पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.17 वाजता सुरू होईल. 2 जानेवारी 2022 रोजी चतुर्दशीची तिथी रविवारी पहाटे 3:41 वाजता संपेल.
मासिक शिवरात्री पूजा मुहूर्त
पंचांगानुसार, पूजा मुहूर्ताची वेळ शनिवार, 01 जानेवारी रोजी रात्री 11.58 पासून सुरू होईल आणि 12.52 पर्यंत चालेल.
मासिक शिवरात्री व्रत पद्धत
मासिक शिवरात्रीला मध्यरात्री पूजा केली जाते ज्याला निशिता काल असेही म्हणतात. याची सुरुवात भगवान शिवाच्या मूर्ती किंवा शिवलिंगाच्या अभिषेकाने होते. भाविक गंगाजल, दूध, दही, तूप, मध, सिंदूर, हळद, गुलाबपाणी आणि बेलची पाने अर्पण करतात. यानंतर शिव आरती किंवा भजने गायली जातात आणि शंख वाजविला जातो. यानंतर भाविक प्रसाद घेतात. शिवरात्रीचा उपवास दिवसभर ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पारण केले जाते.
मासिक शिवरात्री मंत्र
व्रत करताना ओम नमः शिवाय चा जप करणे खूप शुभ मानले जाते.
मासिक शिवरात्रीचे महत्त्व
हिंदूंसाठी मासिक शिवरात्रीचे धार्मिक महत्त्व आहे. भगवान शिवाची उपासना करण्याचा आणि आंतरिक शांतीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)