Mohini Ekadashi 2021 : बंधनातून मुक्त करणारी मोहिनी एकादशी, जाणून घ्या पूजा विधी
वैशाख शुक्ल एकादशी दिवशी मोहिनी एकादशी असते. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते तसंच शाश्वत शांतीची अनुभूती होते. या दिवशी व्रत- उपास करुन मोह-मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे.
पूजन-
संसारात येऊन मनुष्य केवळ प्रारब्धाचे भोग घेत वर्तमान परिस्थितीत भक्ती आणि आराधना करत सुखद भविष्याची निर्मित करतो. एकादशी व्रताचे महत्त्व देखील याकडे संकेत करतात. स्कंद पुराणानुसार मोहिनी एकादशीला समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे वाटे करण्यात आले होते. स्कंद पुराणाच्या अवंतिका खंड यात क्षिप्रेला अमृतदायिनी, पुण्यदायिनी असे म्हटले गेले होते. म्हणून मोहिनी एकादशीला क्षिप्रेत अमृत महोत्सवाचे आयोजन केलं जातं.
अवंतिका खंड यानुसार मोहिनी रूपधारी भगवान विष्णूंनी अवंतिका नगरीत अमृत वितरण केलं होतं. देवासुर संग्राम दरम्यान मोहिनी रूप ठेवून राक्षसांना भुरळ पाडत देवतांना अमृत पान करवले होते. हा दिवस देवासुर संग्रामाचा समापन दिन देखील मानला जातो.
मोहिनी एकादशीला भाविकांनी सकाळी लवकर उठून पूजा-पाठ, सकाळची आरती, सत्संग, एकादशी महात्म्य कथा, प्रवचन ऐकावे.
सोबतच भगवान विष्णूंना चंदन आणि जवस अर्पित करावी कारण हे व्रत परम सात्विकता आणि आचरण शुद्धीचं व्रत असतं. म्हणून आम्हाला आपल्या जीवनात धर्मानुकूल आचरण करत मोक्ष प्राप्तीचं मार्ग शोधणे आवश्यक आहे.
* एकादशीला व्रत न करणार्यांना देखील तांदळाचे सेवन करु नये.
* एकादशी व्रत समस्त पापांचे क्षय करते आणि व्यक्तीच्या आकर्षणात वाढ करते.
* हे व्रत केल्याने मनुष्याला समाज, कुटुंब आणि देशात प्रतिष्ठा मिळते आणि त्यांची किर्ती चारी बाजूला पसरते.
* हा उपवास सर्व आसक्तीपासून मुक्त आहे आणि सर्व पापांचा नाश करणारं आहे.
* एकादशी व्रताच्या प्रभावामुळे मनुष्याला मृत्यूनंतर मिळणार्या नरकाच्या यातनांपासून सुटका मिळतो.
* विष्णु पुराणानुसार मोहिनी एकादशीचे विधीपूर्वक व्रत केल्याने मनुष्य मोह-मायेच्या बंधनातून मुक्त होतो. तसंच व्रत करणार्यांच्या पापांचा नाश होतो.
एकादशीला
'ॐ विष्णवे नम:'
'ॐ नमो भगवते वासुदेवाय
या मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा जप करावा.
मोहिनी एकादशी व्रत सर्व आसक्ती वगैरे नष्ट करते. याहून श्रेष्ठ व्रत नाही. या व्रताचे महत्त्व वाचून किंवा ऐकून एखाद्याला एक हजार गोदान केल्याच्या समतुल्य फळाची प्राप्ती होते.