गुरूवार, 28 सप्टेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (11:17 IST)

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

सोमवारचा स्वामी चंद्र मनाचा प्रतीक आहे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्वात आधी मानची शांती नंतर आरोग्य आणि मग धनाचे आगमन होतं. 
 
जर आपण मानसिक तनावाला लढा देत असाल तर सोमवारी महादेवाला साखर मिश्रित दुधाने अभिषेक करावे. असे केल्याने ताण दूर होतो. मेंदू जलद काम करतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते. जातकाची कार्यक्षेत्रात खूप प्रगती होते.
 
सोमवारचा दिवस महादेवाचा असतो म्हणून या दिवशी चंद्र ग्रहाचे उपाय अमलात आणावे.
 
चंद्र ग्रहाचा संबंध पांढर्‍या रंगाशी असतो आणि हे आमच्या मन आणि पाण्याचे प्रतिनिधित्‍व करतं.
 
चंद्र ग्रहाचा अनुकूल प्रभाव प्राप्‍त करण्यासाठी सर्व प्रकाराचे पांढरे खाद्य पदार्थ जसे दूध आणि दुधाने निर्मित वस्तू, तांदूळ, पांढरे तीळ, अक्रोड-खडीसाखर, बर्फी अश्या गोड पदार्थांचा सेवन करावे. 
 
या दिवशी महादेवाला जलाभिषेक दरम्यान काही तीळ मिसळून 11 बेलपत्रासह अर्पित केल्याने लाभ प्राप्ती होते. सोबतच शिवलिंगावर नेहमी खडीसाखर अर्पित केल्यानंतर गंगाजल अर्पित केले पाहिजे.
 
सोमवारी पांढर्‍या गायीला पोळी आणि गूळ खाऊ घातल्याने सर्व प्रकाराचे कष्ट दूर होतात.
 
सोमवारी पांढर्‍या वस्तू जसे दूध, दही, कपडा, साखर इ वस्तू दान केल्याने लाभ प्राप्ती होते.
 
मासोळ्यांना क‍णकेच्या गोळ्या तयार करुन खाऊ घातल्याने धन, यश, वैभव आणि कीर्ति वाढते.