रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2024 (09:11 IST)

7 वेळा हनुमान चालीसा वाचल्याने कामातील अडथळे दूर होतील, जाणून घ्या कधी आणि कसे वाचावे

Hanuman Chalisa Path Benefits: हिंदू धर्मात सामान्यत: प्रत्येक घरात हनुमान चालीसा वाचली जाते. याने भाविकांवर विशेष कृपा राहते अशी मान्यता आहे. मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्यास भक्तांवर भगवान हनुमानाची विशेष कृपा होते. जर तुम्ही हनुमान चालीसा फक्त एकदा नव्हे तर 7 वेळा वाचली तर तुम्हाला त्याचे काय फळ मिळेल आणि ही चालीसा कधी पाठ करावी हे जाणून घ्या-
 
या दिवशी वाचावी सात वेळा हनुमान चालीसा - तसे तर प्रत्येक दिवस हा देवाचा दिवस असतो आणि तुम्ही हनुमान चालीसा पाठ कधीही करू शकता. पण हनुमान चालीसा मंगळवार आणि शनिवारी सात वेळा पठण केल्यास खूप शुभ मानले जाते. लाल रंगाच्या आसनावर बसून सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे, असे म्हटले जाते की असे केल्याने पवनपुत्र हनुमान प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात. एवढेच नाही तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता.
 
सात वेळा हनुमान चालीसा पठण केल्याचे फायदे
भीती दूर होते - रोज सकाळी उठून सात वेळा हनुमान चालिसाचे पठण केल्यास कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या भीतीने त्रास होत नाही आणि त्याला भीतीपासून मुक्ती मिळते.
नकारात्मकता दूर होते - नियमित सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते.
 
सुख, शांती आणि समृद्धी मिळते - हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी सात वेळा किंवा दररोज किमान एकदा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता.
 
आर्थिक स्थिती सुधारेल - दररोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, व्यवसायात प्रगती होते आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि पदोन्नती मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.