बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 6 मार्च 2024 (11:37 IST)

विजया स्मार्त एकादशी 2024: विजया स्मार्त एकादशीचे महत्त्व, पूजाविधी जाणून घ्या

ekadashi
एकादशी तिथि शुभ असून पद्मपुराण नुसार भगवान शकरांनी नारदमुनी यांना उपदेश करतांना सांगितले होते की, जो व्यक्ती विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसेच या व्रताचे नियम पाळल्याने कामात यश प्राप्त होते. अशी मान्यता आहे. 
 
विजया स्मार्त एकादशीचे व्रत हे सुखसौभाग्यासाठी महत्वाचे व्रत मानले जाते. माघ महीना हा पुराणात अत्यंत महत्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील एकदशीला विजया एकादशीचे व्रत करण्याची पद्धत आहे. 
 
विजया एकादशी 2024- सहा आणि सात मार्च रोजी यावर्षी विजया एकादशी साजरी केली जाईल. पंचांगानुसार सहा मार्चला सहा वाजुन तीस मिनिटांनी एकादशी सुरु होईल. व सात मार्च रोजी चार  वाजुन तेरा  मिनिटांनी एकादशी तिथि समाप्त होईल. 
 
विजया एकादशी तिथि2024- सूर्योदयाच्या वेळी जर दशमी तिथि संपली तर त्या दिवशी एकदशीचा क्षय असतो. म्हणून त्या दिवशी स्मार्त एकादशी तसेच दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीचे व्रत ठेवले जाते. ब्राम्हण पुजारी व ऋषीमुनी हे स्मार्त एकादशीचे व्रत साजरे करतात आणि वैष्णव संसारी भक्त भागवत एकादशीचे व्रत साजरे करतात. 
 
विजया स्मार्त एकादशी महत्व- भगवान शंकरांनी नारदमुनींना सांगितले की एकादशी ही तिथि शुभ असते. व या दिवशी जो हे व्रत करतो त्यांच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसेच या व्रतचे नियम आचरणात आणल्यास त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश प्राप्त होते. तसेच या एकादशीचे व्रत केल्यास श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते. तसेच घरात सुख-समृद्धि, ऐश्वर्य नांदते. व धनसंपत्ती वाढते. 
 
विजया स्मार्त एकादशी पूजाविधी-  धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई, फळ, फूल, पंचामृत, 
सकाळी लवकर उठून रोजचे कार्य झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावे. तसेच भगवान श्रीहरि विष्णूंची आराधना करावी. यादिवशी व्रताचा संकल्प करून गंगाजल, जल, पिवळी फूले, पंचामृत, पिवळे चंदन हे भगवान श्रीहरि विष्णूंना अर्पण करावे. तसेच नैवेद्यात तुळशीचे पाने ठेवून मग नैवेद्य दाखवावा व प्रसाद सर्वांना वाटावा. यामुळे भगवान श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik