1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

Name of Bholenath
Daridra Dahan Shiv Stotra with Meaning दरिद्र्य दहन स्तोत्र हे भगवान शिवाची अशी स्तुती आहे, ज्यामुळे केवळ महादेवाचाच नव्हे तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. यामुळे माणसाची गरिबी आणि निराधारपणा दूर होतो. चला संपूर्ण दरिद्रीय दहन स्तोत्र वाचूया.
 
विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय
शशिशेखराय धारणाय कर्पूरकांति धवलाय जटाधराय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।1।
 
गौरी प्रियाय रजनीश कलाधराय कालान्तकाय
भुजंगाधिप कंकणाय गंगाधराय गजराज विमर्दनाय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।2।
 
भक्ति प्रियाय भवरोग भयापहाय
उग्राय दुर्गमभवसागर तारणाय
ज्योतिर्मयाय गुणनाम सुनृत्यकाय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।3।
 
चर्माम्बराय शवभस्म विलेपनाय
भालेक्षणाय मणिकुंडल मण्डिताय
मंजीर पादयुगलाय जटाधराय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय....।4।
 
पंचाननाय फणिराज विभूषणाय
हेमांशुकाय भुवनत्रय मण्डिताय
अनन्त भूमि वरदाय तमोमयाय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।5।
 
भानुप्रियाय भवसागर तारणाय
कालान्तकाय कमलासन पूजिताय
नेत्रत्रयाय शुभलक्षण लक्षिताय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।6।
 
रामप्रियाय रघुनाथ वर प्रदाय
नागप्रियाय नरकार्णवतारणाय
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।7।
 
मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय
गति प्रियाय वृषभेश्वर वाहनाय
मातंग चर्मवसनाय महेश्वराय
दारिद्रय दु:ख दहनाय नम: शिवाय...।8।
 
दारिद्र्य दहन शिव स्तोत्र अर्थ
जे जगाचे स्वामी आहे,
जगासारख्या नरकाच्या महासागरातून आपल्याला जे वाचवणार आहे,
ज्यांची नावे कानांनी ऐकायला अमृतसारखी आहेत,
जे आपल्या भाल्यावर चंद्राला अलंकार धारण करतात,
ज्याचे केस कापूरच्या चकाकीसारखे पांढरे शुभ्र आहेत,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।1।
 
जे आई गौरीला खूप प्रिय आहे,
जे रजनीश्वर (चंद्र) ची कला धारण करतात.
जे काळाचे शेवटचे (यम) रूप आहे,
कंकणच्या रूपात भगवान नागाचे रूप धारण करणारे,
शीशवर गंगा धारण करणारे,
जे गजराजाचा नाश करणार आहेत,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।2।
 
जे भक्त आणि सांसारिक रोग आणि भय यांचा नाश करणारे आहे,
नाशाच्या वेळी जे उग्र असतात,
जीवनाचा दुर्गम महासागर पार करण्यास जे मदत करणार,
जे प्रकाशाच्या रूपात आहेत, जे त्यांच्या गुण आणि नावानुसार सुंदर नृत्य करतात,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।3।
 
जे वाघाचे कातडे घालतात,
जे चिताभस्म धारण करतात,
भालात तिसरा डोळा असणारे
जे रत्नांच्या कानातले सजलेले आहेत,
जे पायात पायघोळ घालणारे आहेत,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।4।
 
पंचमुखी नागाच्या रूपात अलंकारांनी सजलेले,
सोन्यासारखे किरण असणारे,
आनंदभूमीला (काशी) वरदान देणारे,
सृष्टिच्या संहारासाठी तमोगुनाविष्ट होणारे,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।5।
 
सूर्याला खूप प्रिय,
भवसागरातून तारणार,
कालासाठीही महाकालस्वरूप आणि कमलासन (ब्रह्मा) ज्यांची पूजा करतात,
त्रिनेत्र असणारे,
शुभ लक्षणांनी आशीर्वादित,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।6।
 
रामाला प्रिय आहे आणि रघुनाथजींना वरदान देणारे.
नागांचे अतीप्रिय,
अस्तित्वाच्या सागराच्या रूपात आपल्याला नरकापासून वाचवणारे,
पुण्यवानांमध्ये सर्वात पुण्यवान,
ज्याची सर्व देवता पूजा करतात,
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।7।
 
जो मुक्त लोकांचा स्वामी आहे,
जे चारही प्रयत्नांचे फळ देतात,
ज्यांना गाणी आवडतात आणि ज्यांचे वाहन नंदी आहे,
गजचर्म वस्त्ररुपात धारण करणारे, महेश्वर होय.
दारिद्र्याच्या दु:खाचा नाश करणाऱ्या शिवाला मी नमस्कार करतो. ।8।