सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Updated : सोमवार, 4 मार्च 2024 (18:54 IST)

कच्चा पपईचा हलवा जाणून घ्या रेसिपी

papaya
तुम्ही कधी कच्चा पपईचा हलवा बनवाला आहे का? कच्चा पपईचा हलवा हा खूप स्वादिष्ट लागतो आणि आरोग्यासाठी देखील चांगला असतो. चला जाणून घेऊ या कच्चा पपईचा हलवा कसा बनवायचा   रेसिपी
साहित्य
1 कच्ची पपई(मीडियम साइज ची)    
250 ग्रॅम दूध 
1 छोटा चमचा खोबऱ्याचा किस  
10-15 किशमिश, काजू आणि बादाम 
1 कप गूळ 
पाव चमचा वेलची पूड 
शुद्ध देशी तूप आवश्‍यकतानुसार     
 
कृती 
सर्वात आधी कच्ची पपई धुवून घ्यावी. मग तिचे साल काढून तिला कापावी व त्यातील बिया काढून घ्या. आता पपई किसुन घ्यावी. एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेली पपई टाका. नरम होईपर्यंत परतवून घ्यावे. पपई चांगली परतवून झाल्यावर त्यात दूध टाकावे. व घट्टपणा येईपर्यंत शिजवावे. आता एका दुसऱ्या पातेलित पाणी गरम करून गूळ टाकावा व त्याचा पाक तयार करून घ्यावा. पपईचा किस शिजल्यावर  त्यात गुलाचा गूळाचा पाक टाकावा आता हे मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. मग यात किशमिश, काजू आणि बादाम, वेलची पूड मिक्स करून हलवावे. हा हलवा तुम्ही उपासाला देखील खाऊ शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik