1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

मखाने बर्फी कशी बनवायची जाणून घ्या रेसिपी

व्रत-उपवास या दिवशी तुम्हाला जर गोड खायचे असेल तर बनवा छान अशी मखाने बर्फी, लिहून घ्या रेसिपी 

साहित्य-
200 ग्राम मखाने 
150 ग्राम शेंगदाणे 
400 ग्राम साखर 
1 चमचा वेलची पुड 
1/2 कप सुकमेवाचे काप     
थोडेसे केशर आणि तूप 
 
कृती- 
शेंगदाण्याचे दाणे भाजून बारीक करणे. एका कढईत तूप गरम करून मखाने शेकून घ्या. मग ते थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्या. मग एक भांडयात साखारमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून पाक तयार करणे. मग त्यात खवा, बारीक केलेले शेंगदाणे, वेलची पूड, आणि केशर टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. आता ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण त्यावर टाका. त्यावर सुकमेवाचे काप टाकून सजवा व थंड झाल्यावर तुमच्या आवडी नुसार काप देऊन आकार द्या . व्रत-उपवास मध्ये चलणारी ही चविष्ट मखाने बर्फी आरोग्यदायी पण आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik