1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र रेसिपी
Written By
Last Updated : शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (15:41 IST)

Shardiya Navratri 2023 : उपवासासाठी बनवा चविष्ट साबुदाणा डोसा, रेसिपी जाणून घ्या

नवरात्रीच्या काळात उपवास ठेवत असाल आणि फक्त हलके अन्न खाण्याची इच्छा होत असेल तर आपण उपवासासाठी साबुदाणा बनवतो.पण साबुदाणा चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.  पण आपण साबुदाणा खिचडीच्या व्यतिरिक्त साबुदाणा डोसा बनवा.हे नक्कीच तुम्हाला आवडेल. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य
साबुदाणा - 150 ग्रॅम
शेंगदाणा कूट  - 2 चमचे
हिरवी मिरची - 4 (चिरलेली)
सेंधव मीठ - चवीनुसार
काळी मिरी पावडर - 1 टीस्पून
तूप - 1 टीस्पून
पनीर -1छोटा कप
 
कृती- 
सर्व प्रथम, आपण साबुदाणा स्वच्छ करून भिजवून घेऊ, यामुळे पीठ बनवणे सोपे होईल. नाहीतर साबुदाणा पावडर बनवू शकता. पावडर बनवण्यासाठी तुम्ही मिक्सर  जार वापरू शकता. 
यानंतर एका भांड्यात पावडर काढा आणि हिरव्या मिरच्या धुवून बारीक कापून घ्या. नंतर काळी मिरी पावडर , सेंधव मीठ, तूप आणि पाणी असे सर्व साहित्य घाला .
नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट  घालून मिक्स करून एक गुळगुळीत पीठ तयार करा. हे पीठ सुमारे 10 मिनिटे ठेवा आणि गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर चमच्याच्या साहाय्याने पीठ गोल आकारात पसरवा. 
 
डोसा शिजायला लागल्यावर उलटा, तूप घालून दुसऱ्या बाजूला शिजवण्यासाठी ठेवा. डोसा दोन्ही बाजूंनी शिजल्यावर प्लेटमध्ये काढून गरमागरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा  .
 







Edited by - Priya Dixit