शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य विधी जाणून घ्या

surya arghya
सूर्याला अर्घ्य दिल्याने मनुष्य सामर्थ्यवान, धनवान आणि रूपवान होतो. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. आत्मविश्वास व नेतृत्व क्षमता वाढते. आपलं वर्चस्व असावं अशी इच्छा बाळगणार्‍यांनी तर नक्कीच सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. पायात चप्पल- जोडे नसावे.
तांब्याचा लोटा घेऊन त्यात शुद्ध पाणी, खडीसाखर किंवा फुल मिसळावे. सूर्याला नुसत्या पाण्याने अर्घ्य देऊ नये.
नारंगी प्रकाश दिसत असताना सूर्याला अर्घ्य द्यावा.
सूर्याकडे बघत अर्घ्य द्यावे. याने डोळ्याची ज्योत वाढते तसेच शरीरात ऊर्जा निर्माण होते.
अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करावा.
कोणत्याही कारणाने सूर्य दिसत नसेल तरी पूर्व दिशेकडे तोंड करून अर्घ्य द्यावे.
अर्घ्य देत असलेले पाणी जमिनीवर पडू नये याची काळजी घ्यावी.
झाडाजवळ अर्घ्य द्यावे किंवा खाली कुंडा असावा ज्यात पाणी पडेल.
अर्घ्य दिल्यावर बोटाने पाणी चारीकडे शिंपडावे नंतर आपल्या मस्तक आणि डोळ्यावर लावावे.
अर्घ्य दिल्यावर तीनदा प्रदक्षिणा घालावी.
कुटुंबातील मुखिया अर्घ्य देत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ फळ प्राप्त होतं.
 
Edited By - Priya Dixit