रविवार, 2 एप्रिल 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (09:29 IST)

रमा एकादशीचा उपवास केल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात

कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्ष एकादशीला रमा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी उपवास ठेवून भगवान कृष्णांची पूजा केली जाते. यावेळी रमा एकादशी 3 नोव्हेंबर रोजी आहे. मान्यतांनुसार, या उपवासाच्या प्रभावाने सर्व पाप नष्ट होतात, अगदी ब्रह्महत्या सारखे प्रचंड पाप देखील दूर होतात. सौभाग्यवती महिलांसाठी, हा उपवास आनंद आणि शुभ मानला जातो. 
 
उपवास बद्दल विशेष गोष्टी
 
1. उपवास पद्धत - रमा एकादशीला सकाळी लवकर उठून, लवकर अंघोळ केल्यावर उपास करण्याचा संकल्प करा. ज्या प्रकारे आपण उपास करू शकता, त्याचप्रमाणे संकल्प घ्या. उदाहरणार्थ - जर आपण पूर्ण दिवस काही न खाता, राहू शकत असाल किंवा एकदा फलाहार करण्यास इच्छुक असाल.
* त्यानंतर पंचकर्माच्या उपासनेत श्रीकृष्णाची पूजा करावी. जर आपण स्वत: पूजा करू शकत नसाल तर पूजा करण्यासाठी कोणत्याही सक्षम ब्राह्मणांना बोलवू शकता.
* यानंतर, देवाला नैवेद्य लावावा आणि प्रसाद भक्तांना वाटावा. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील श्रीकृष्णाची पूजा करावी. रात्री, भगवानच्या मूर्तीच्या बाजूला बसून श्रीमद भागवत किंवा गीता वाचावी.
* पुढच्या दिवशी ब्राह्मणांना आमंत्रित करा. ब्राह्मणांना अन्न व दान देऊन ससम्मान त्यांना विदा करावे. त्या नंतरच अन्न घ्यावे. देवाला माखन-मिश्रीचे भोग लावले तर खूप चांगले होईल.
 
2. उपवास कथा - रमा एकादशीच्या उपवासाची कथेचे वर्णन श्री पद्मा पुराणात केले आहे, जे पुढीलप्रमाणे आहे-
* प्राचीन काळात मुचुकुंद नावाचा एक राजा होता. देवराज इंद्र, यम, वरूण, कुबेर आणि विभीषण त्यांचे मित्र होते. तो अतिशय धार्मिक आणि सत्यवादी होता. त्यांच्या राज्यात सर्व आनंदी होते.
* त्यांची चंद्रभागा नावाची एक मुलगी होती, राजा चंद्रसेनच्या मुलगा शोभंशी तिचे विवाह झाले होते. एक दिवस, जेव्हा शोभन आपल्या सासुरवाडी गेला तर त्या दिवशी देखील एकादशी होती.
* शोभनने एकादशीचे उपवास करायचे ठरवले. चंद्रभागाला चिंता होती की तिचा पती भुक कशी सहन करेल. या बाबतीत तिच्या वडिलांचे आदेश खूप कठोर होते. 
* राज्यात सर्व एकादशीचा उपवास ठेवायचे आणि कोणीही अन्नाचे सेवन करत नव्हते. शोभनने आपल्या पत्नीकडून असे उपाय जाणून घेण्याचे प्रयत्न केले ज्यामुळे त्याचे व्रत देखील पूर्ण होऊन जाईल आणि त्याला काही वेदना देखील होणार नाही, पण चंद्रभागाला असे कोणतेही समाधान सापडले नाही. अशा परिस्थितीत शोभन भुकेला, तहानलेला नाही राहू शकला आणि तो मरण पावला. यामुळे चंद्रभागाला खूप दुःख झाले. वडिलांच्या विरोधामुळे ती सती झाली नाही.
* दुसरीकडे, शोभनने रमा एकादशीच्या प्रभावामुळे मंदराचल पर्वताच्या शिखरावर आपल्याला महान देवनगर मिळवला. तिथे ऐश्वर्याचे सर्व स्रोत उपलब्ध होते. गंधर्वांनी त्याची पूजा केली आणि अप्सरांनी त्याची सेवा केली.
* एके दिवशी जेव्हा राजा मुचुकुंद मंदराचल पर्वत आले, तेव्हा त्याने आपल्या जावयाची भव्यता पाहिली. तो आपल्या गावी परत आला आणि संपूर्ण गोष्ट चंद्रभागाला सांगितली, ती हे ऐकून खूप आनंदी झाली.
* ती तिच्या पतीकडे गेली आणि त्यांच्या भक्ती आणि रमा एकादशीच्या प्रभावामुळे तिनी शोभन बरोबर आनंदाने जगणे सुरू केले.
 
3. रमा एकादशी शुभ मुहूर्त - रमा एकादशी तिथी प्रारंभ: 3 नोव्हेंबरला सकाळी 5:10 वाजता
                       रमा एकादशी तिथी समाप्त: 4 नोव्हेंबरला सकाळी 3:13 वाजता
                       रमा एकादशी पारणं वेळ: 4 नोव्हेंबरला सकाळी 08:47 ते 08:49
 
4. रमा एकादशीचे महत्त्व - पौराणिक मतानुसार रमा नाश करून भगवान विष्णूचा धाम मिळवतो. मृत्यू झाल्यानंतर त्याला मोक्ष मिळते.