रामाचा विडा
विडा घ्या हो रामराया । महाराज राजया ।। धृ।।
रत्नजडित पानदान। आली जानकी घेवोन । विडा देत करुनीयां । दीनबंधो रामराया । विडा ।।1।।।
सुगंध गंगेरी पाने । मुक्त मोतियाचा चुना । सुपारी कातगोळ्या । भक्तिभावे मेळवील्या । विडा ।।2।।
जायपत्री जायफळ । विडा जाहला सुफळ । सीता रामलागीं देत । केशरकस्तूरीयुक्त ।। विडा ।। 3।।
सीताराम विडा घेतां । ऐक्यभावे एकात्मता । रंगली ऐक्यरंगी । रामदास पायां लागी । विडा घ्या हो रामराया । महाराज राजया ।।4।।