मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (17:41 IST)

Sankashti Chaturthi 2021 जाणून घ्या या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी शुभ काळ आणि चंद्रोदयाची वेळ

2021 हे वर्ष संपणार आहे, अशा परिस्थितीत या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीचा उपवासही भाविकांसाठी विशेष आहे. गणेश भक्त संकष्टी चतुर्थी श्रद्धेने साजरी करतील. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित केलेला अत्यंत पुण्यपूर्ण दिवस आहे.
 
या दिवशी भक्त संकटांना हरवण्यासाठी श्री गणेशाची पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना करतात. असे म्हणतात की या दिवशी भगवंताची मनपासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात चतुर्थी व्रत 22 डिसेंबरला रोजी म्हणजेच बुधवारी येत आहे. संकष्टी चतुर्थी व्रत 2021 हा या वर्षातील शेवटचा व्रत आहे. विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थीला चंद्राच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थी व्रताची तारीख, पूजेची वेळ आणि चंद्र उगवण्याची वेळ जाणून घेऊया.
संकष्टी चतुर्थी 2021 तिथि आणि पूजा मुहूर्त (Sankashti Chaturthi Tithi and Puja Muhurat)
मार्गशीष महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी तिथि 22 डिसेंबर रोजी बुधवारी संध्याकाळी 04:52 वाजेपासून सुरु होईल जेव्हाकी समापन 23 डिसेंबर रोजी गुरुवारी संध्याकाळी 06:27 मिनिटावर होईल. संकष्टी चतुर्थी तिथिला (Sankashti Chaturthi 2021) चंद्र पूजेचं महत्व आहे म्हणून चंद्रोदय 22 डिसेंबर रोजी होणार, आणि याच दिवशी पूजन केलं जाईल. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 8 वाजून 48 मिनिटांनी आहे. चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. यावेळी चंद्राला जल अर्पण करण्याचा विधी असतो.
संकष्टी चतुर्थी पूजा विधी
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी व स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. 
असे म्हटले जाते की या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्यास ते खूप शुभ असते. 
यानंतर गणपतीची पूजा करा आणि यावेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवा. 
गणपतीला फळे आणि फुले अर्पण करा. देवाला दुर्वा वाहाव्या.
पूजेमध्ये तीळ, गूळ, लाडू, फुले आणि तांब्याच्या कलशात पाणी, उदबत्ती, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे.
दिवसभर देवाचे स्मरण करून उपवास ठेवा आणि संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा वाचून चंद्राला जल अर्पण करून व्रत पूर्ण करा.