मंगळवार, 5 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (09:09 IST)

Sankashti Chaturthi 2021: 31 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या पौराणिक कथा

प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते परंतू पौष महिन्यात येणार्‍या चतुर्थीला खास महत्त्व आहे. यंदा चतुर्थी 31 जानेवारी रोजी येत आहे. या दिवशी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर व्रताचे पारणं केलं जातं. काही जागी या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची देखील परंपरा आहे.
 
या संकष्टी चतुर्थीला तिळाचे लाडू, तिळाचे मोदक यांच नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत आई आपल्या मुलांच्या दीघार्युष्यासाठी करते. या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, वक्रकुंडी चतुर्थी, असे अनके नावे आहेत. प्रत्येक व्रतामागील काही कारणं असतात तसेच यामागील एक कथा प्रचलित आहे. तर जाणून घ्या चतुर्थीची कथा...
 
 
‍भगवान शिव यांचे अनेक गण होते, ते पार्वती देवींचा आदेश ऐकत असे परंतू शिवाचा आदेश त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा असे. एकदा पार्वती देवीने विचार केला की असे काही घडले पाहिजे ज्याने त्यांनी केवळ माझ्या आदेशाचे पालन करावे. तेव्हा पार्वती देवीने आपल्या उटण्याने एका बालकाची आकृती तयार केली आणि त्यात प्राण ओतले. हा बालक पार्वती पुत्र गणेश म्हणून ओळखला जातो.
 
या विषयी शिवाला कल्पना नव्हती. जेव्हा देवी स्नानासाठी गेल्या त्यांनी गणेशाला दारावर उभे केले आणि कोणालाही आत येऊ देऊ नये अशी आज्ञा केली. दरम्यान शिवांचे गण तेथे आले परंतू बालक गणेशाने त्यांना प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा त्यांच्यात द्वंद झाले. गणेशाने सर्वांना परास्त करुन पळवून लावले. हे कळल्यावर शिव क्रोधित झाले. रागाच्या भरात त्यांनी आपल्या त्रिशूलने गणेशाचे धड डोक्याहून वेगळे केले. 
 
जेव्हा पार्वती बाहेर आल्या तेव्हा आपल्या पुत्राची अशी दशा बघून त्या द्रवित झाल्या. दु:ख आणि क्रोधात त्यांनी गणेशाला जीवनदान देण्याचा आग्रह धरला. हे सर्व कळल्यावर शिवाने गणेशाला हत्तीचं ‍शीश आणून लावले आणि जिवंत केले. ज्यामुळे ते गजानन म्हणून ओळखले जाऊ लागले. सर्व 33 कोटि देवी-देवतांनी गणपतीला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून चतुर्थी तिथी व्रताची परंपरा पडली.