शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

संकष्टी चतुर्थी: या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा आशीर्वाद

आज संकष्टी चतुर्थी तिथी आहे. अनेक लोकं दर महिन्यात येणारे हे चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक करतात. गणपती देवता समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे. परंतू या दिवशी काही विशेष उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. जर जाणून घ्या या दिवशी कोणते फल मिळवण्यासाठी काय उपाय करायचे आहे ते:
 
आपण आपले मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू भेट करू शकता.
 
एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिर जावे आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी. शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावे आणि शक्य नसेल तर मंदिरात ठेवून द्यावे. याने रुसलेला मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील.
 
व्यवसायात उन्नतीसाठी बुध मंत्र ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: हे मंत्र 21 वेळा जपावे.
 
काही विशेष मनोकामनापुरतीसाठी गणपतीची विधिपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गूळ- खोबर्‍याचे नैवेद्य दाखवावे.
 
ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पित करावे.
 
सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे. याने सुख- सौभाग्यात वृद्धी होते.
 
उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ऊँ गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
 
तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल, प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी. आपल्याला कामात यश मिळेल.