सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified शनिवार, 4 डिसेंबर 2021 (10:32 IST)

Amavasya December 2021: शनिश्चरी अमावस्येला शनि मंत्रांचा पाठ करा, सर्व दुःख दूर होतील

शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने दुःख दूर होते. यावेळी शनिवारी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्येचा योगायोग असल्याने शनि अमावस्या आहे. या दिवशी सकाळी स्नान करून दान करून शनिदेवाची पूजा करावी. यासाठी कोणत्याही शनि मंदिरात किंवा पूजाघरात शनिदेवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि शनि चालिसाचे पठण करावे. शनी चालिसामध्ये कर्मफल देणार्‍या शनिदेवाचे शौर्य आणि गुणांचे वर्णन केले आहे. मनापासून शनि चालिसाचे पठण करूनही तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता, ज्यामुळे तुमचे दुःख दूर होऊ शकते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. शनि मंत्राचे नियमित पठण केल्याने शनिदेवाच्या धैय्या आणि साडेसतीच्या त्रासात आराम मिळतो.
 
शनीदेवाचे मंत्र स्त्री व पुरुष दोघेही करु शकतात. मंत्रांचे जप करताना पूर्व-पश्चिम दिशेकडे मुख असावे.
शनिदेवाचे मंत्र जप करण्याची उत्तम वेळ संध्याकाळी असते.
शनिदेवाचे मंत्र रुद्राक्ष माळीने करावे.
जप करताना पांढरे किंवा नीळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे.
 
बीज मंत्र- 'शं' लिहून आपण स्वत:जवळ ठेवू शकता किंवा हे मंत्र काम करत असलेल्या ठिकाणी लावू शकतात.
वैदिक मंत्र- 'ऊँ शं शनैश्चराय नम:' मंत्राचा जप सकाळ-संध्याकाळ 108 वेळा करावा. याने शनी देव प्रसन्न राहतात.
तांत्रिक मंत्र- श‍नीची दशा असल्यास 'ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:' मंत्राचा जप करावा.
पौराणिक मंत्र- शनी संबंधी पूजा सुरु करण्यापूर्वी 'नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम' मंत्राचे जप करावे.
सर्वात प्रभावी मंत्र- 'सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः मंदचार प्रसन्नात्मा पीड़ां हरतु में शनिः' हे मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. साडेसाती किंवा ढय्याच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
 
केव्हा जपावा शनी मंत्र
जेव्हा आपल्या कुंडलीत प्रबळ समस्यांचे योग बनत असतील किंवा शनीमुळे अपघात किंवा जीवावर संकटाचे योग बनत असतील तर शनी मंत्र जपावे. शनी मारक असल्यास शनीचा जपच त्यावर उपाय आहे.
जेव्हा शनीमुळे सतत संघर्षाला तोंड द्यावं लागत असेल तर मंत्र जपावे.
शनीची साडेसाती किंवा ढय्या सुरु असेल तर मंत्र प्रभावी कार्य करतील. सर्व समस्या दूर होतील.