बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (13:46 IST)

शनी प्रदोष व्रत : शनी प्रदोष व्रताचे महत्त्व जाणून घ्या, आणि हे 10 सोपे उपाय करून बघा ....

शनिदेवाची उपासना केल्यास त्याचे सर्व त्रास आणि समस्या नक्कीच दूर होतात आणि शनीचा कोप, शनीची साडेसाती किंवा ढैयाचा प्रभाव कमी होतो, ह्याचा अनुभव भाविक स्वतः घेऊन दुसऱ्याचे त्रास कमी करू शकतो.
 
असे मानले जाते की प्रदोष काळात शंकर साक्षात शिवलिंगावर अवतरतात म्हणून या वेळेस शंकराचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने चांगली फलप्राप्ति होते.
 
याचा सह शनी प्रदोष असल्यामुळे शनीची पूजा करणं देखील फायदेशीर असत. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शनीला प्रसन्न करण्यासाठीचे बरेच उपाय आहेत जे केल्याने शनिदेवाची शांतता केली जाते या मध्ये शनिप्रदोषच्या दिवसाचा जास्त महत्त्व आहे. जाणून घेऊ या की कोणते उपाय करावयाचे आहे-
 
शनिप्रदोषासाठी चे 10 सोपे चमत्कारिक उपाय :-
 
1 शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी शनी प्रदोष उपवास अतिशय फळदायी आहे. हे उपवास करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा मिळते.
2 शनिप्रदोषाच्या निमित्ताने भगवान शंकराचे भस्म(राख किंवा रक्षा) आणि तिलाभिषेक करणं फायदेशीर असत.
3 या दिवशी दशरथकृत शनी स्तोत्राचे वाचन किंवा पठण  केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या आणि शनीच्या अशुभ प्रभावामुळे पडणारे दुष्प्रभाव कमी होतात. उपवासधारकांना या पाठाचे वाचन किमान 11 वेळा केले पाहिजे.
4  या व्यतिरिक्त शनी चालीसा, शनैश्चरस्तवराज:, शिवचालिसाचे वाचन आणि आरती केली पाहिजे.
5 शनी प्रदोषाला पार्थिव शिवलिंगाचे तेलाने अभिषेक करावे.
6 शनी प्रदोषाला महाकालाचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते. म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालाचे दर्शन करावं.
7 शनी प्रदोषाला भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य दाखवावा.
8 शनी प्रदोष उपवास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी चांगला असतो. याचा उपवास करणाऱ्यांनी शनी प्रदोषाच्या दिवशी सकाळच्या वेळेस भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी.
9 या शिवाय दूध, दही, तूप, नर्मदेचे पाणी, गंगेचे पाणी, मध याने अभिषेक करावा. श्रावण महिन्यात या निमित्ताने शिवलिंग बांधण्यात येतं.
10 या दिवशी शिव चालीसा, प्रदोष स्तोत्र, कथा, शंकराची आरती आणि मंत्राचा जप केल्याने शनीशी निगडित दोषांपासून सुटका होऊन  सर्व दोष दूर होतात.