Festival Posters

|| शरीरी वसे रामायण ||

रविवार, 11 एप्रिल 2021 (11:42 IST)
जाणतो ना कांही आपण
शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||
 
आत्मा म्हणजे रामच केवळ,
मन म्हणजे हो सीता निर्मळ !
जागरुकता हा तर लक्ष्मण,
शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||
 
श्वास, प्राण हा मारुतराया,
फिरतो जगवित आपुली काया |
या आत्म्याचे करीतो रक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||
 
नील जाम्बुवंत रक्त नसा या,
फिरती शोधत जनक तनया
गर्वच म्हणजे असतो रावण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||
 
रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,
भाव भावना त्यातील वावर
मोहांधता करी आरोग्य भक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||
 
नखें केंस त्वचा शरीरावरती,
शरीर नगरीचे रक्षण करती
बंधु खरे हे करती राखण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||
 
क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,
शांत असता घोरत पडतो
डिवचताच त्या करी रणक्रंदन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||
 
गर्वे हरले सौख्य मनाचे
कांसाविस हो जीवन आमुचे
संकटी येई शरीर एकवटून
शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||
 
मनन करता भगवंताचे,
रक्षण होईल आरोग्याचे
राम जपाचे अखंड चिंतन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||
 
||  रामार्पणमस्तु  ||

सर्व पहा

आषाढ महिन्याची आजपासून सुरुवात; या ७ गोष्टी केल्यास विष्णू-लक्ष्मीची कृपा लाभते

परिव्राजकाचार्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त वंदन

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वांमी महाराज यांची आरती

श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : सर्व संकटांपासून संरक्षण देणारे प्रभावी दत्त स्तोत्र

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments