महालक्ष्मीस्तुतिः मराठी अर्थासह

Mahalakshmi Stuti
Last Modified शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (09:15 IST)
अगस्तिरुवाच
मातर्नमामि कमले कमलायताक्षि श्रीविष्णुहृत्कमलवासिनि विश्वमातः ।
क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरि लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ १ ॥
त्वं श्रीरुपेन्द्रसदने मदनैकमात- र्ज्योत्स्नासि चन्द्रमसि चन्द्रमनोहरास्ये ।
सूर्ये प्रभासि च जगत्त्रितये प्रभासि लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ २ ॥
त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्ति- र्वेधास्त्वया जगदिदं विविधं विदध्यात् ।
विश्वम्भरोऽपि बिभृयादखिलं भवत्या लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ३ ॥
त्वत्त्यक्तमेतदमले हरते हरोऽपि त्वं पासि हंसि विदधासि परावरासि ।
ईड्यो बभूव हरिरप्यमले त्वदाप्त्या लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ४ ॥
शूरः स एव स गुणी स बुधः स धन्यो मान्यः स एव कुलशीलकलाकलापैः ।
एकः शुचिः स हि पुमान् सकलेऽपि लोके यत्रापतेत्तव शुभे करुणाकटाक्षः ॥ ५ ॥
यस्मिन्वसेः क्षणमहो पुरुषे गजेऽश्वे स्त्रैणे तृणे सरसि देवकुले गृहेऽन्ने ।
रत्ने पतत्रिणि पशौ शयने धरायां सश्रीकमेव सकले तदिहास्ति नान्यत् ॥ ६ ॥
त्वत्स्पृष्टमेव सकलं शुचितां लभेत त्वत्त्यक्तमेव सकलं त्वशुचीह लक्ष्मि ।
त्वन्नाम यत्र च सुमड़्गलमेव तत्र श्रीविष्णुपत्नि कमले कमलालयेऽपि ॥ ७ ॥
लक्ष्मीं श्रियं च कमलां कमलालयां च पद्मां रमां नलिनयुग्मकरां च मां च ।
क्षीरोदजाममृतकुम्भकरामिरां च विष्णुप्रियामिति सदा जपतां क्व दुःखम् ॥ ८ ॥
ये पठिष्यन्ति च स्तोत्रं त्वद्भक्त्या मत्कृतं सदा ।
तेषां कदाचित् संतापो माऽस्तु माऽस्तु दरिद्रता ॥ ९ ॥
माऽस्तु चेष्टवियोगश्च माऽस्तु सम्पत्तिसंक्षयः ।
सर्वत्र विजयश्चाऽस्तु विच्छदो माऽस्तु सन्ततेः ॥ १० ॥
श्रीरुवाच
एवमस्तु मुने सर्वं यत्त्वया परिभाषितम् ।
एतत् स्तोत्रस्य पठनं मम सांनिध्यकारणम् ॥ ११ ॥
॥ इति श्रीस्कन्दमहापुराणे काशीखण्डे अगस्तिकृता महालक्ष्मीस्तुतिः सम्पूर्णा ॥
महालक्ष्मीस्तुतिः मराठी अर्थ

अगस्ति ऋषी म्हणाले

१) कमलासारखे विशाल नेत्र असलेल्या माते मी तुला नमस्कार करतो. आपण भगवान श्रीविष्णुंच्या हृदयकमलांत निवास करता आणि या विश्वाची जननी आपणच आहात. कमलाच्या गर्भाप्रमाणे गोर्‍या वर्णाच्या हे क्षीरसागर कन्ये महालक्ष्मी आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
२) मदन (प्रद्दुम्न) ची एकमात्र माता रुक्मिणीरुपधरिणी माते, आपण भगवान विष्णुच्या वैकुण्ठधामांत "श्री" नावाने प्रसिद्ध आहात. चंद्राप्रमाणे मनोहर मुख असणार्‍या देवि, चंद्रामधिल चांदणी आपणच आहात. तसेच सूर्याची प्रभा आपणच आहात. तीन्ही लोक आपणच प्रभावित करता. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

३) आपणच अग्निमधिल दाहक शक्ति आहात. ब्रह्मदेव आपल्याच सहाय्याने विविध प्रकारच्या विश्वाची रचना करतात. संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करणारे श्रीविष्णु हे आपल्याच भरवशावर सर्वांचे पालन करतात. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

४) निर्मलरुप असलेल्या देवि, ज्यांचा आपण त्याग केलेला आहे त्याचाच भगवान रुद्र संहार करतात. वास्तविक आपणच या जगताचे पालन, संहार आणि निर्माण करता. आपणच कार्य-कारण स्वरुप जगत आहात. हे निर्मलस्वरुप लक्ष्मी, आपल्याला प्राप्त करुनच भगवान श्रीहरि सर्वांना पूजनिय झाले. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

५) हे शुभे, ज्या पुरुषावर आपला कृपाकटाक्ष होतो, या संसारांत तोच एकमात्र शूरवीर, गुणवान, धन्य, मान्य, कुलीन, शीलवान तसेच अनेक कलांचा ज्ञाता आणि परम पवित्र मानला जातो.

६) हे देवि, आपण क्षणभरसुद्धा ज्या पुरुषांत, हत्तीत, घोड्यांत, स्त्रैण, तृण, सरोवर, देवमन्दिर, घर, अन्न, रत्न, पशु-पक्षी, शय्या अथवा भूमिवर राहता तेच या जगांत शोभायमान होते दुसरे काहिही नाही.

७) हे विष्णुपत्नि! हे कमले, हे कमलालये, हे माता लक्ष्मि! आपण ज्याला स्पर्श करता ते पवित्र होते. आपण ज्याचा त्याग करता ते सर्व या जगांत अपवित्र होते. जेथे आपले नाव आहे ते उत्तम व मंगल आहे.

८) जे लक्ष्मी, श्री, कमला, कमलालया, पद्मा, रमा, नलिनयुग्मकरा (दोन्ही हातांत कमल धारण करणारी), मा, क्षीरोदजा, अमृतकुम्भकरा (हातांत अमृतचा कलश धारण करणारी), इरा आणि विष्णुप्रिया या नावांचा नेहमी जप करतात त्याना दुःख होत नाही.

९-१०) (या स्तुतिने प्रसन्न होऊन देवीने वर माग असे सांगितल्यावर अगस्ति मुनी म्हणाले हे देवि! ) माझ्याकडून केलेल्या या स्तुतिचा जे भक्तिपूर्वक पाठ करतील त्याना कधि संताप होणार नाही तसेच दरिद्रता येणार नाही. त्याना जे इष्ट आहे त्याचा त्याना वियोग होणार नाही. आणि त्याच्या धनाचा नाश होणार नाही. त्याना सर्वत्र विजय प्राप्त होवो आणि त्याच्या संततिचा त्याना कधि वियोग न होवो.

११) श्रीलक्ष्मी म्हणाली, हे मुने, जसे आपण इच्छिता तसेच होइल. या स्तोत्राचा पाठ माझी प्राप्ती (सांनिध्य) करुन देणारा होइल.

अशा रितीने श्रीस्कन्दमहापुराणांतील काशीखण्डांतील अगस्ति मुनिने केलेल्या महालक्ष्मीस्तुतिचा पाठ पुरा झाला.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व

गंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व
भागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त ...

Ganga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि ...

Ganga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि सन्मानासाठी हे खास 8 उपाय
यंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या ...

आपल्यावर भगवान शिवाचे ऋ‍ण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती

आपल्यावर भगवान शिवाचे ऋ‍ण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती
मनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा ...

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?
1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक ...

Shankaracharya Jayanti 2021: आज आहे शंकराचार्य जयंती, ...

Shankaracharya Jayanti 2021: आज आहे शंकराचार्य जयंती, त्यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या
धार्मिक मान्यतानुसार, आदी शंकराचार्य यांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...