रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (11:21 IST)

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसची जोरदार धडक, चौघांचा मृत्यू

accident
पालघर जिल्ह्यातील डहाणु परिसरात महालक्ष्मी जवळ  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसची धडक झाली. कार  गुजरात हुन मुंबई कडे जात होती. वाटेत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती बसवर जाऊन आदळली. आज मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून बस चालक देखील जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ या महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले. 
 
Edited By- Priya Dixit