गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (08:11 IST)

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

jyotiba temple kolhapur
जय जय ज्योती दीन दयाळा, सदा करी भक्त प्रतिपाळा
त्रिगुण ज्योती स्वरूप ओंकारा,संकटी तारा भवभयहारा
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, ज्योतिर्मय तू श्रीरवळेश्वर
दयाधना ज्योती सौदागर,क्रमण पदी श्रीरूप मनोहर
मूलस्वरूप श्री बद्रिकेदार, शूलपाणी शिव कैलासेश्वर
मृत्युंजय श्री महारुद्रेश्वर ,रुद्रावतारी श्री त्रिपुरेश्वर
विष्णुरुप अंश ते शेषांसन , डमरू त्रिशूल हाती शंभूसंम
ब्राह्मत्मा परब्रम्ह स्वरूपम, रणांगणी तू जमदग्नीसंम
श्री ज्योतिबा देव दयाधन, घोडा तयाचे मुख्य वाहन
उपवाहन शेष जाण, दिव्य मनोहारी स्वरूपमान
खड्ग त्रिशूल अमृतपात्र, डमरु ही आयुध्ये हाती धारण
चतुर्भुज ही मूर्ती मंदिरी, ज्योतिबा देव आहे रत्नागिरी
श्रीनाथा अश्वारूढ होऊनि ,अखंड पृथ्वी भ्रमण करुनि
अमृतपात्र घेऊनी हाती, भक्तजनांचा उद्धार करिती
हिमालयाचा त्याग करुनि, रत्नागिरीवर आले धाऊनी
रत्नभोज रत्नासुर मर्दोनी, श्रीनाथा सुखी केली अवनी
कालभैरव न चर्पट अंबा, माय यमाई लक्ष्मी जगदंबा
अष्टभैरव ते सन्निधनाथा, भक्ता रक्षिसी तू दीनानाथा
रक्तभोज रत्नासुर करिती, ज्योतीबाची विरोध भक्ती
नाथा हस्ते मरण मागती, नाथ तयांचा उद्धार करिती
खारीक खोबरे गुलाल दवणा, वाहती या देवाच्या चरणा
नामस्मरण करिता प्रार्थना, पूर्ण करी भक्तांची कामना
युगे युगे अवतार तू घेसी, भक्तांसाठी धाऊनी येसीं
संकटकाली रक्षण करिसी,दीन दुःखीताना आनंद देसी
विदुरा घरच्या कण्या भक्षिसी,प्रल्हादास्तव स्तंभि प्रकटशी
ध्रुव बाळाला दर्शन देशी,नावजी भक्ता प्रसन्न होसी
वेदशास्त्र अन सर्व पुराणे,वर्णन करिती एक मुखाने
त्रय देवाच्या तेज ज्योतीचे, तेजोमय रूप श्रीनाथाचे
वर्णन करुनी शेष ही थकला, लीन होऊनि पदी राहिला
आसन दिधले श्रीनाथाना,नत होऊनिया करू वंदना
चैत्र श्रावणी यात्रा मोठी, दुरदूरचे भक्त ही जमती
छत्रचामरे ज्योतिबावरती, गुलालाची उधळण करिती
ज्योतिबादेव चांगला भला, म्हणून म्हणती चांगभला
म्हणूनि आपण ही तयाला, हात जोडावे नमस्काराला
मनोभावे ही करता सेवा, धावत येई नाथ सखा हा
हाती गवसला अमृत ठेवा, तृप्त होऊनि करू या धावा
श्रीनाथा तुझे शांत हे रूप,पाहुनी होई आनंद अमाप
ज्योतिस्वरूप हे मनी ध्याती,कुंभ सुखाचा येईल हाती
भुक्ती मुक्ती दायक श्री नाथा,भवसागरी तारक तू नाथा
रक्षी रक्षी पल पल श्री नाथा,तू सुखदाता भाग्यविधाता
।। इति श्री ज्योतिबा चालीसा संपूर्णम ।।