Marathi Biodata Maker

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सोळावा

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:32 IST)
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ जयजयाजी मार्तंडराया ॥ जयजयाजी प्राणसखया ॥ जयजयाजी करुणालया ॥ अगाध महिमा तुझा हो ॥१॥
मल्ल म्हणे मार्तंड राय ॥ तूं परतोनि कैलासी जाय ॥ तूं युध्दासी योग्य न होय ॥ अद्भुत पराक्रम पाहे माझा ॥२॥
मार्तंडें शस्त्रास्त्र सोडिलें ॥ तें चूर्ण करोनि पुढें आले ॥ मार्तंडे बाण वृष्टि केले ॥ त्यासही न गणी मल्ल ॥३॥
डाव्या बाजूच्या भागांत ॥ सांबाने खड्ग मारिलें त्वरित ॥ मल्ल जाहला मूर्च्छित ॥ कुंजर दैत्य जाहला ॥४॥
अजस्त्र रुप दीर्घ दांत ॥ पुच्छ फडां सागरात्कारें खळबळीत ॥ सोंड करितांचि गगनांत ॥ स्वर्गी लोक उठोनि पळती ॥५॥
ज्याची गर्जना ऐसी ॥ मेघ पडती भुईसी ॥ खड्ग त्याचे मस्तकासीं ॥ मार्तंडानें मारिलें ॥६॥
सांबासि दैत्य बोले ॥ म्हणे बल तुझे काय जाहले ॥ आज मजला कळों आलें ॥ पुरुषार्थ तुझे ॥७॥
सांब क्रोधासि येवोन ॥ अग्निअस्त्र दिधलें सोडून ॥ तों दैत्य व्याकुळ होवोन ॥ भूमिवरी क्षणभर पडे ॥८॥
तितक्यांत मल्ल पर्जन्यास्त्र ॥ सोडोनि बुडविलें दळसशस्त्र ॥ सोडितां रुद्र वायुअस्त्र ॥ सर्पास्त्र मल्ले सोडिलें ॥९॥
सांबें गरुडास्त्र सोडून ॥ सर्पास्त्र दिधलें तोडोन ॥ पशुपती मंत्रे कडोन ॥ त्रिशुळ सोडिला मार्तंडे ॥१०॥
गदा मुद्गर बाण मुसळ ॥ शक्ति फरश लांगूल ॥ इतुक्यातेंही वारिलें मल्लें ॥ नाटोपोनि हृदयी संचरले ॥११॥
पळूं लागला घाबरा होऊन ॥ भूमीस पडला भवंडून ॥ युध्द करी रे म्हणोन ॥ मस्तकीं मार्तंडे पाय दिधला ॥१२॥
 इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१३॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लासुरवधनो नाम षोडशोऽध्याय गोड हा ॥१६॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय सतरावा

सर्व पहा

संतान गोपाळ स्तोत्रम् : संततीसाठी भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी दररोज करा या पवित्र स्तोत्राचे पठण

दररोज म्हणा सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रम्, माता दुर्गेची कृपा आणि सुख-समृद्धी मिळवा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

देवी शाकंभरीला समर्पित स्तुतिपर स्तोत्र ''श्री शाकंभर्यष्टकम्''

Panchashloki Ganesh Puran : अत्यंत प्रभावी स्तोत्र पञ्चश्लोकि गणेश पुराण

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments