रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (09:16 IST)

गणपती स्तोत्र मध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने

आपण असंख्य वेळेला हे "गणपती स्तोत्र" "संकटनाशन स्तोत्र" म्हणतो परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाहीत....
 
नारदकृत - 'संकटनाशन' स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने....
प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकम् । 
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्
लम्बोदरं पंचमं च षष्ठ विकटमेव च । 
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । 
एकादशम् गणपति द्वादशं तु गजाननम्।
 
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ
२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.
३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.
४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.
५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात. 
(१) रत्नागिरीजिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात, 
(२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.
६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.
७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.
८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. 
२) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.
९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.
१०. विनायक :- काशीक्षेत्रातील अन्नपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.
११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.
१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.
 
समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात
 
।। जय श्री गणेश ।।