शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 मे 2022 (16:44 IST)

Shani Jayanti 2022: शनि जयंतीला पूजेत ही कामे करू नका, या 10 खास गोष्टी लक्षात ठेवा

shani pradosh
Shani Jayanti 2022: सोमवती अमावस्या, शनि जयंती हे एकत्र येत आहे. काही लोकं या दिवशी वट सावित्री अमावस्या व्रत देखील करतात. या दिवशी जिथे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवतात, तिथे लोक शनिदेवासाठी उपवास करतात आणि पूजेसह उपाय करतात. भगवान सूर्यदेव आणि छाया हे शनिदेवाचे पालक आहेत. शनि आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर काही गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा.
 
1. गरजू व्यक्तीकडून कधीही पैसे हडप करण्याचा प्रयत्न करू नका. शक्य असल्यास त्याला मदत करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
2. आपल्या पालकांचा आदर करा. यामुळे शनिदेवही प्रसन्न होतात. गरीबांना मदत करणाऱ्यांवर शनिदेव आशीर्वाद देतात.
3. शनिदेवाला प्रसन्न ठेवायचे असेल तर सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा. आपल्या अधीनस्थ लोकांशी चांगले वागावे.
4. शनिदेवाच्या पूजेमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या डोळ्यांकडे पाहून पूजा करू नये.
5. पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून शनिदेवाची पूजा करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
6. शनि जयंतीच्या दिवशी आजारी व्यक्तीला औषध आणि अन्न दान करणे उत्तम.
7. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ मंदिरात पंडितला दूध आणि पांढरी मिठाई द्या.
8. अत्याचारिताची चेष्टा करू नका, शक्य असल्यास त्याला मदत करा.
9. तुमच्या क्षमतेनुसार ओम शम शनिश्चराय नम: एक जपमाळ, तीन फेरे, पाच फेरे जप करा.
10. या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान करणे देखील चांगले असते.