गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (22:01 IST)

गुरुवारच्या उपवासात चुकून देखील ही कामे करू नका, त्रास होऊ शकतो

Hair Mask
हिंदी पंचागमध्ये आठवड्यातील सातही दिवस वेगवेग्ळया देवतांची पूजा केली जाते. गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत गुरु ग्रह योग्य घरात स्थित असेल तर जीवनात सुख-शांती येऊ लागते. माणसाच्या आयुष्यात सुखसोयी, संपत्तीआणि प्रेम वाढतं. त्यामुळे लोक या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. पण जर कुंडलीत बृहस्पति कमजोर झाला तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच श्रद्धेनुसार असे काहीही चुकूनही गुरुवारी करू नये.
 
गुरुवारच्या उपवासात या गोष्टी टाळा
 
1. धार्मिक मान्यतांनुसार एखाद्या व्यक्तीने गुरुवारी कपडे धुणे, मुंडण करणे, डोके धुणे, नखे कापणे आणि केस कापणे टाळावे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकतं आणि गुरुवारी या कामांमुळे जीवनात धन आणि समृद्धीची कमतरता असते.
 
2. पुराणानुसार गुरुवारी व्रत करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असले पाहिजे. या दिवशी व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे जंक फूड खाऊ नये. शाकाहारी अन्न ग्रहण करावे.
 
3. घराची साफसफाई करणे जसे की घरातील रद्दी काढणे, घर पुसणे आणि जाळे काढणे हे गुरुवारी करण्यास सक्त मनाई आहे.
 
 
4. हिंदू संस्कृतीनुसार गुरुवारी घरातील मोठ्यांचा अनादर करणे टाळावे. नाहीतर जीवनात दु:खाचा डोंगर कोसळतो.
 
5. व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी खिचडी आणि मीठ वापरू नये.
 
ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण वरीलपैकी कोणतेही कार्य गुरुवारी केले तर आपल्या जीवनावर गुरु ग्रहाचा विपरीत परिणाम होतो. ते आपल्या जीवनात दु:ख आणते.  म्हणूनच चुकूनही या गोष्टी करू नयेत.