शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 24 जून 2021 (11:45 IST)

वटवृक्षा सारखा वृक्ष, त्यास पुजावे

Vat Punmia
मागितले दान सावित्री ने पती चे,
केले व्रत ,धरिले पाय तिनं भगवंतांचे,
पाहून तिचं पतीप्रेम, तो ही कळवळला, 
परत केले प्राण सत्यवानाचे, देवही गहिवरला,
अशी असते शक्ती स्त्रीची, यमास ही परतवले,
देवादीकात सावित्रीने स्थान मिळविले,
वटवृक्षा सारखा वृक्ष, त्यास पुजावे,
पर्यावरणाचे मोल जाणुनी, वृक्ष लावावे,
त्यायोगे आपणही निकट जाऊ वनराई च्या,
ओळखून मोल आयुर्वेदाचे शरण जाऊ त्याच्या,
प्राणवायू चे स्रोत असें हा वृक्षराज,
करू पूजा त्याची, ज्याची असें गरज आज!!
...अश्विनी थत्ते.