शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (11:59 IST)

Vat Savitri Purnima 2023 वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी हे 5 उपाय करा, पैशांची तंगी दूर होईल

वट सावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते. वट पौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात, परंतु आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या दिवशी केवळ 5 उपाय केले तर धनाचा ओघ वाढतो.
 
1. पहिला उपाय : या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कच्चे दूध मिसळून बताशा घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. रखडलेले पैसे मिळतील आणि व्यवसायातही फायदा होईल.
 
2. दुसरा उपाय: देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर 11 कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळद लावून तिलक लावा. यानंतर हे कवड्या लाल कपड्यात बांधून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीत ठेवा. त्यामुळे आर्थिक संकट दूर होईल.
 
3. तिसरा उपाय : पती-पत्नी दोघेही जर या दिवशी उपवास करतात आणि चंद्रदेवांना दूध अर्पण करतात. तर यामुळे त्याच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील.
 
4. चौथा उपाय: ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही वटवृक्षात राहतात. म्हणूनच या दिवशी वटवृक्षाची विधिवत पूजा केल्यास प्रदक्षिणा केल्यास घरात सुख-शांती नांदते आणि धनलक्ष्मीचा वास होतो.
 
5. पाचवा उपाय : कर्जमुक्तीसाठी 11 दिवस संध्याकाळी वटवृक्षाजवळ पिठाचा चारमुखी दिवा लावावा. दिवा तुपाचा असावा. असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आणि आर्थिक संकट दूर होईल.