रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

विनायक चतुर्थी संपूर्ण माहिती मराठी

Ganesha
गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची या दिवशी पूजा केली जाते.
 
विनायक चतुर्थी पूजा विधी
विनायक चतुर्थीला स्नान करून धूतवस्त्र नेसावे. 
घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला चौरंग किंवा पाट ठेवावा. 
त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. 
त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्या- पितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी.
मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. 
गणपतीला टिळक करावे.
गणपतीची विधीपूर्वक पूजा करावी.
जानवं घालावे.
गणपतीला लाल फुल आणि दुर्वा अर्पित कराव्यात.
गणेशाला शेंदुर अर्पित करावं.
लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीची आरती करावी.
 
गणपतीची विधीपूर्वक पूजा
आचमन करून
केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।
असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि
 
गोविंदाय नमः ।
असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडून
 
स्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि
असे म्हणावे.
 
वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।
असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. तांबडे किंवा पांढरे गंध लावावे
 
चंदनं समर्पयामि
म्हणून नमस्कार करावा.
 
हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।
हळद-कुंकू लावावे.
 
अक्षतां-विनायकाय नमः ।
अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.
 
फुले-पुष्पाणि समर्पयामि
म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहूं नये, बेल चालतो.
 
दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि
म्हणत दुर्वा वाहाव्या. ।
 
धूपं-विनायकाय नमः ।
असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला धूपं-समर्पयामी म्हणत ओवाळावे. दीप-निरंजनाची वात पेटवून निरांजनदिप समर्पयामि असं म्हणून ओवाळावे.
 
नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि
असे म्हणून गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा
 
नमस्करोमि
असे म्हणून नमस्कार करावा. 
 
प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणां समर्पयामि म्हणावे व हातातील पुष्पांजलि पुष्पांजलि समर्पयामि असे म्हणून देवावर वाहावी. पूजा झाल्यावर खालील प्रार्थना म्हणावी -
 
विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥
नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥
नमस्कारान् समर्पयामि ।
नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे. 
॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥
 
विसर्जन -
संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीची आरती, मंत्र कहाणी करावी.
गणपतीची आरती मराठीत
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
विनायक चतुर्थी व्रत कथा
एकदा महादेव स्नान केल्यानंतर कैलाश पर्वताहून भोगवती गेले. महादेवांच्या प्रस्थानानंतर देवी पार्वती स्नानसाठी जाताना त्यांनी आपल्या अंगाच्या मळपासून एक बाळ तयार केलं आणि त्यात प्राण फुंकून त्याला सजीव केलं.
 
त्याचं नावं देवीने गणपती असे ठेवलं. पार्वती देवीने अंघोळीला जाताना गणपतीला सांगितलं की मी अंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको. तेव्हा गणपती बाहेर पहारा देत उभे राहिले. 
 
तेवढ्यात शंकर घरी परतले आणि पार्वतीकडे जायला निघाले तर गणपतीने त्यांना अडवले. महादेवांना हा मुलगा कोण हे ठाऊकच नव्हतं. गणपतीद्वारे आत प्रवेशासाठी 
 
शंकाराला रागाच्या भरात बघून पार्वती देवीला वाटले की त्यांना भोजन वाढण्यात उशिर झाला असावा म्हणून ते नाराज आहेत म्हणून त्यांनी 2 थाळीत भोजन वाढून जेवण्याचा आग्रह केला. दोन ताटं बघून महादेवांनी विचारले की दुसरं ताट कोणाचे आहे? तेव्हा पार्वतीने सांगितले की हे त्यांच्या पुत्र गणेशासाठी आहे, जो दारावर पहारा देत आहे. तेव्हा शंकराने क्रोधित होऊन त्याचं डोकं उडवल्याचं सांगितलं. 
 
हे ऐकून पार्वती देवी विलाप करु लागल्या. त्यांनी शंकरांना डोकं शरीराला जुळवून त्याला जीवित करण्याचा हठ्ठ धरला. तेव्हा महादेवांनी एका हत्तीचं डोकं गणेशाच्या शरीराला जोडले. आपल्या पुत्राला जीवित बघून पार्वती देवी खूप प्रसन्न झाल्या.