गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (08:36 IST)

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

Hanuman
मंगळवारी उपास करणे खूप फायदेशीरआहे. या दिवशी उपवास करणाऱ्यांवर हनुमानाची कृपादृष्टी होते. आयुष्यात शांतता येते. मंगळवारचा उपास कधी पासून करावा आणि पूजा विधी काय आहे जाणून घ्या.  
 
मंगळवारचे उपवास कधी पासून करावे आणि वेळ आणि पूजाविधी -
हनुमानाचे उपवास नियमितपणे 21 मंगळवार करावे. मंगळवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून हनुमानाचे ध्यान करावे आणि उपवास करण्याचे संकल्प घ्यावे. ही वेळ पूजेसाठी सर्वोत्तम मानली आहे. या मुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो. 
नंतर उत्तर-पूर्व दिशेला एखाद्या एकांतात हनुमानाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. तसेच हनुमानाला शेंदूर अर्पण करावे. फळांचा नेवेद्य दाखवावा. असं केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
हनुमान मंत्र -
ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसहांरणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. –
मंगळवारचा उपवास करताना या मंत्राचे जाप करावे. या मुळे आपली सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात आनंद बहरेल.